नवी दिल्ली - देशात 1,70,841 रुग्णांना व्हेटिंलेटरची गरज आहे. तर 9,02,291 जणांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली.
देशामध्ये 4,88,861 रुग्णांना आयसीयू बेडची गरज होती, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रिगटाची आज 25 वी ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
हेही वाचा-डीआरडीओकडून कोरोनाच्या लढ्याकरिता औषध विकसित; डीजीसीआयकडून मंजुरी
बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप एस. पुरी, केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे उपस्थित होते. तर अश्विनी कुमार चौबे आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल हे ऑनलाईन उपस्थित होते.