शिमला-हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. दरड कोसळण्याच्या घटनेत अनेक वाहने आणि 40 प्रवासी घेऊन जाणारी बस गाडली गेल्याचे किन्नौर जिल्ह्याचे उपायुक्त अबीद हुसेन सादिक यांनी सांगितले. दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून काढण्यात आले आहेत. अद्याप घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेली बस ही हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (HRTC) होती. या बसमध्ये 40 प्रवासी होते. ही बस किन्नौरमधील रेकाँग पीओवरून शिमलाच्या दिशेने जात होती. मदकार्यासाठी सैन्यदलाच्या राष्ट्रीय आपत्कालीन कृती दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक बचाव पथकाला बोलाविण्यात आल्याचे उपायुक्त अबीद हुसेन सादिक यांनी सांगितले. दगड कोसळत असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.
हेही वाचा-IAS टॉपर टीना डाबी अन् पती IAS अतहर खान यांचा घटस्फोट मंजूर
सोलन जिल्ह्यातील दरड कोसळण्याच्या घटनेत मंगळवारी 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखणी झाले आहेत. नाहान-कुमारहट्टी एनएच एनएच 907 या ठिकाणी लाडूजवळही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यंदा मान्सूनच्या आगमनापासून हिमाचल प्रदेशमध्ये 30 दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.