मुंबई - जगातील जवळपास दोन तृतीयांश लोकसंख्येला आमच्या 1 किंवा अधिक लसींनी संरक्षण दिले आहे. आमच्या बहुतेक लसी गरीब राष्ट्रांनी वापरल्या आहेत. असा दावा सिरम इन्स्टीट्युशनचे प्रमुख सायरस पूनावाला यांनी केला आहे. (Invitation for Participation at Pune International Business Summit 2022) ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) या उद्योग संस्थेने आयोजित केलेल्या 'पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट'मध्ये ते बोलत होते.
जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येला कंपनीच्या एक किंवा अधिक लसी देण्यात आल्या
जगातील गरीब देश आमच्या कंपनीने बनवलेल्या लसींचा वापर करत आहेत. त्याचे कारण दुसरे काही नसून लसीचा डोस आम्ही स्वस्त दरात उपलब्ध करून दिला आहे हे आहे असही पुनावाला म्हणाले आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) या उद्योग संस्थेने आयोजित केलेल्या पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिटमध्ये ही माहिती दिली आहे. कार्यक्रमात पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ते म्हणाले की, जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येला कंपनीच्या एक किंवा अधिक लसी देण्यात आल्या आहेत.
आज या संस्थेद्वारे जगभरात 1.5 अब्ज लसी तयार केल्या
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ची सुरुवात 1966 मध्ये झाली. सायरन यांनी ही कंपनी 12,000 मध्ये सुरू केली. लवकरच ही संस्था जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादकांपैकी एक बनेल असा विश्वास व्यक्त केला जातो. आज या संस्थेद्वारे जगभरात 1.5 अब्ज लसी तयार केल्या गेल्या आहेत. आणि त्या विकल्या जात आहेत. सध्या (BCG) लसीपासून पोलिओ, डिप्थीरिया, धनुर्वात अशा मुलांच्या लसीकरणापर्यंत प्रत्येक लस ही संस्था तयार करत आहे.