तिरुअनंतपुरम (केरळ) Oscars 2024 : केरळमधील विनाशकारी पुरावर आधारित मल्याळम चित्रपट '2018-एव्हरीवन इज अ हिरो'ची ऑस्कर पुरस्कार 2024 साठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं (एफएफआय) बुधवारी ही घोषणा केली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, निवड समितीचे अध्यक्ष गिरीश कासारवल्ली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 16 सदस्यीय ज्युरीनं देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मल्याळम चित्रपटाची एकमतानं निवड केली.
ऑस्करचे स्वप्न पाहतोय : ईटीव्ही भारतशी खास बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक जूड अँथनी जोसेफ म्हणाले, '2018- प्रत्येकजण एक हिरो आहे' 2018 च्या पुराबद्दलच्या त्याच्या वैयक्तिक अनुभवातून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपटला ऑस्करसाठी पुरस्करासाठी नामांकन मिळाणार माझ्या स्वप्नात कधीच नव्हते. आता मी ऑस्करचे स्वप्न पाहत आहे.
चित्रपटाचे मुख्य अभिनेते टोविनो थॉमस म्हणाले की टीमसाठी हा आनंदाचा काळ आहे. ते सध्या सेप्टिमियस अवॉर्ड्ससाठी ॲमस्टरडॅममध्ये आहे. थाॅमस यांना '2018' साठी सर्वोत्कृष्ट आशियाई अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. आमचा चित्रपट '2018' ची ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्याच्या आश्चर्यकारक बातमीने अधिक आनंद झाला. आम्ही कठीण परिस्थितीत खूप मेहनत केली. या चित्रपटाला आता आंतरराष्ट्रीय ख्याती मिळत असल्याचं थाॅमस म्हणाले.