मेहसाणा -गुन्हेगारीच्या इतिहासात पहिल्यांदाच मेहसाणामध्ये एक घटना उघडकीस आली आहे. फोनच्या जोरावर जुगार खेळून रशियात करोडोंचा जुगार खेळणाऱ्या क्रिकेट सट्टेबाजांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मेहसाणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात 21 खेळाडूंची निवड करण्यात आली होती, ते शेतमजूर ( Fake IPL IN Gujrat )आहेत.
वडनगरमधील मोलीपूर गावात 21 स्थानिक खेळाडूंमध्ये टी-20 सामना खेळला गेला. ज्याचे यु-ट्यूब वरती प्रक्षेपण करण्यात आलं. रशियात बसून काही जण या सामन्यावरती सट्ट लावत होते. त्यासाठी मोलीपूरमधील धरोई कालव्याजवळील गुलाम मासी यांच्या शेताचा वापर करण्यात आला. हे शेत सोएब अब्दुल वाला यांनी भाड्याने दिले होते. ज्यामध्ये क्रिकेटचे मैदान तयार करून दोन संघ तयार करण्यात आले. जमिनीवर अत्याधुनिक कॅमेरा सेटअप करण्यात आला होता. ज्याद्वारे या सामन्याचे चित्रीकरण करण्यात आले आणि क्रिकेरोस नावाच्या नावाच्या अॅपद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं. हा सामना पाहण्यासाठी ह्या अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागणार होते.
संपूर्ण थेट प्रक्षेपणाची जबाबदारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मोहम्मद साकिब रियाझुद्दीन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्याने त्याचा टेलिग्राम (सोशल मीडिया अॅप्लिकेशन) उघडला आणि रशियातील सट्टेबाज आशिफ मोहम्मदशी गप्पा मारल्या. जी खरोखरच फसवणूक होती. त्यानंतर, त्याच्या सूचनेनुसार, पंच कोल्हू मोहम्मद अबुबकर आणि सादिक अब्दुल मजीद दावडा चौकार मारतील किंवा विकेट घेतील. असा क्रिकेटचा सामना 15 दिवसांपासून सुरू होता. हे संपूर्ण नेटवर्क शोएब दावडा आणि रशियाचा शकुनी आशिफ मोहम्मद यांच्या सांगण्यावरून चालवले जात होते.