महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गरबा खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आयोजकांकडून नवरात्री पासवर जीएसटी आकारणार नसल्याचा निर्णय

कोरोना काळात नवरात्री उत्सव धुमधडाक्यात ( Navratri utsav pass gst people ) झाला नाही. मात्र, आता कोरोनाचा फैलाव कमी झाला असून त्यासंबंधी नियमही शिथिल ( Organizers on navratri utsav pass gst vadodra ) करण्यात आल्याने नागरिकांना पूर्वी प्रमाणे हा उत्सव जल्लोषात साजरा करता येणार आहे.

navratri utsav pass gst people
नवरात्री उत्सव पास जीएसटी वडोदरा

By

Published : Aug 4, 2022, 11:38 AM IST

वडोदरा (गुजरात) -कोरोना काळात नवरात्री उत्सव धुमधडाक्यात ( Navratri utsav pass gst people ) झाला नाही. मात्र, आता कोरोनाचा फैलाव कमी झाला असून त्यासंबंधी नियमही शिथिल ( Organizers on navratri utsav pass gst vadodra ) करण्यात आल्याने नागरिकांना पूर्वी प्रमाणे हा उत्सव जल्लोषात साजरा करता येणार आहे. गुजरात मध्ये नवरात्री उत्सवानिमित्त गरबा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठी पासेस असतात, पण त्यावर 18 टक्के जीएसटी लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र, आता आयोजकांनी मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा -Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहिमेमुळे सिरसिल्लामध्ये राष्ट्रध्वज बनवण्याचे काम जोरात सुरू

पासेसवरील जीएसटी नागरिकांकडून वसूलनार नाही, असा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.आम्ही निश्चित केलेल्या शुल्कामध्ये जीएसटी भरणे येत असेल तर आमची संस्था ते भरेल, असे वडोदरा नवरात्रोत्सवाचे व्यवस्थापक मयंक पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. आयोजकांनी असे केल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.


मात्र लोकांकडून जीएसटीची कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही. महिलांच्या पाससाठी केवळ कुरिअर शुल्क आकारले जाईल, ज्याची किंमत 200 ते 300 रुपये आहे. आमची संघटना जीएसटीसंबंधी काहीही शुल्क आकारणार नाही, असे मयंक पटेल यांनी स्पष्ट केले. सरकारने केलेल्या नियमानुसार जीएसटी भरावा लागला तर आम्ही सामान्य शुल्काने जीएसटी भरू. वडोदरा नवरात्रोत्सवासाठी नोंदणी १५ ऑगस्टनंतर सुरू होईल.

हेही वाचा -food Video : विविध भाज्या वापरून केलेला पोटॅटो लॉलिपॉप; पाहा रेसिपी व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details