चंदीगड - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ( Bhagwant Mann PM Modi visit ) भेट घेतली. त्यांची पंतप्रधान मोदींसोबतची ही पहिलीच भेट होती. यादरम्यान मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारकडे विशेष पॅकेजची मागणी ( Special package for Punjab ) केल्याने आता राजकारण चांगलेच तापले आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनावरून विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली जात आहे.
रोड मॅप अंमलबजावणी आम आदमी पक्षाच्या आवाक्याबाहेर
भगवंत मान यांच्यावर टीका करताना भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा ( BJP leader Manjinder Singh Sirsa ) म्हणाले की, ते मतदानापूर्वी पंजाबमध्ये मोठमोठ्या गप्पा मारायचे. लोकांना चांगलं वाटावे म्हणून आकर्षण आश्वासने दिली. तेव्हा भगवंत मान म्हणायचे की आजवर सुरू असलेला पंजाबमधील भ्रष्टाचार ( Bhagwant Mann on Punjab Corruption ) संपेल. त्यातून पैसा गोळा करून प्रांताच्या विकासात गुंतविला जाईल. मनजिंदरसिंग सिरसा पुढे म्हणाले की, आता सरकार स्थापन झाले आहे. ) आश्वासने दिली असून ते देशाच्या पंतप्रधानांकडे पैशाची मागणी करत आहेत. अशा स्थितीत कोणत्याही राज्यातील सरकार मतदान जिंकण्यासाठी आश्वासने देते. त्यानंतर केंद्र सरकारकडे पैसे मागते. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी आम आदमी पक्षावर टीका करताना म्हटले आहे की, आम आदमी पक्ष योजना पूर्ण करू शकत नाही. रोड मॅप अंमलबजावणी त्यांच्या आवाक्याबाहेर आहे.