महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

No Confidence Motion In Lok Sabha : विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्षांविरुद्ध आणणार अविश्वास प्रस्ताव? काँग्रेसकडून तयारी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची चर्चा आहे. यासंदर्भात काँग्रेस नेत्यांची विरोधी पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Om Birla
ओम बिर्ला

By

Published : Mar 29, 2023, 8:20 AM IST

नवी दिल्ली : विरोधी सदस्यांना बोलू दिले जात नसल्याच्या कारणावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष पुढील आठवड्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहेत. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत यासंदर्भात एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विरोधी पक्षांची परस्पर सहमती असल्यास येत्या सोमवारी लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो.

किमान 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक : सूत्रांच्या अनुसार, या मुद्यावरून काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी त्यांना किमान 50 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे की, अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी सभागृहाचे कामकाज चालणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवणे तसेच त्यांना दिल्लीतील त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस पाठवणे, यावरून काल संसदेत विरोधक आणि सरकार यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला. केंद्र सरकार आम्हाला जाणूनबुजून लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केला आहे. सोमवारी देखील विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात काळे कपडे घालून गोंधळ घातला होता.

विरोधी पक्षांचा शांतता मोर्चा : बदनामीच्या खटल्यात दोषी ठरल्याच्या एका दिवसानंतर, विरोधकांना अदानी मुद्दा मांडण्याची संधी मिळत नसल्याचा दावा करणाऱ्या अधिसूचनेसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, राहुल गांधींच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या अपात्रतेच्या विरोधात काँग्रेस खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी लाल किल्ल्याजवळ 'लोकशाही वाचवा शांतता मोर्चा' काढला. या दरम्यान, कारभार सुरळीत ठेवण्यासाठी पक्षातील अनेक नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

'आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क' :आंदोलकांना ठिकठिकाणी रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केला आहे. ते म्हणाले की, देशातील लोकशाहीची स्थिती पाहिली पाहिजे. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक शांततेत आंदोलन करत आहेत. या संदर्भात पोलीस प्रशासनाशी बोलून त्यांनी परवानगी दिली होती. मात्र आज त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी रोखले. शांततापूर्ण निषेध व्यक्त करण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही. आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा :Chat GPT In Court : न्यायालयाने पहिल्यांदाच चॅट जीपीटीच्या मदतीने दिला निकाल!, जाणून घ्या भविष्यात किती प्रभावी ठरेल

ABOUT THE AUTHOR

...view details