महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खंडणीप्रकरणाचे लोकसभेत पडसाद; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणा, गिरीश बापट आक्रमक - गृहमंत्री अनिल देशमुख

लोकसभा
लोकसभा

By

Published : Mar 22, 2021, 2:45 PM IST

Updated : Mar 22, 2021, 6:28 PM IST

17:13 March 22

लोकसभेत पंजाबचे काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग यांनी घेतली ठाकरे सरकारची बाजू

लोकसभेत पंजाबचे काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग

भाजपाच्या खासदारांनी गृहमंत्री अनिल देशमूख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर  पंजाबचे काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग हे ठाकरे सरकारच्या मदतीसाठी धावले. त्यांनी ठाकरे सरकारची बाजू घेत, बॅटिंग केली. भाजपाकडून महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचं काम सुरू केलं आहे. बाहेरचे लोक महाराष्ट्रात ढवळाढवळ करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात नाक खुपसू नये, असं सांगत सिंग यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

14:05 March 22

लोकसभेत नवनीत राणा यांची महाराष्ट्रात राजवट लागू करण्याची मागणी

लोकसभेत नवनीत राणा

महाराष्ट्रात खंडणी वसुली करण्याचं काम आहे. एका अधिकारी 16 वर्ष निलंबित होता. ज्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. त्यांना पुन्हा कामावर का घेतले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी  सचिन वाझे यांना कामावर घेण्याची मागणी केली होती. मात्र, ती मागणी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली होती, असे राणा यांनी सांगितले.  या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचा थेट संबंध असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रात राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली. सचिन वाझेंमुळे परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. कट्या मुंबईतून महिन्याला 100 कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?”, अशी विचारणा नवनीत राणा यांनी यावेळी केली.

14:04 March 22

जबलपूरचे खासदार राकेश सिंह यांचा लोकसभेत गदारोळ

लोकसभेत राकेश सिंह

मध्य प्रदेशातील जबलपूरचे खासदार राकेश सिंह यांनी खंडणीप्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली. हे प्रकरण लहान नाही. महाराष्ट्रातून किती वसूली करण्यात आली, याबाबत माहिती समोर आली पाहिजे. तसेच मुख्यमंत्री या विषयावर गप्प असल्याचे ते म्हणाले.

14:04 March 22

मनोजभाई कोटक यांची लोकसभेत महाराष्ट्र सरकारवर टीका

लोकसभेत मनोजभाई कोटक

भाजपाचे खासदार मनोजभाई कोटक यांनी खंडणीप्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. जर मुंबईमध्ये असे हाल असतील. तर संपूर्ण महाराष्ट्रातील शहरांची काय स्थिती असेल, असे ते म्हणाले.  या खंडणीप्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही ते म्हणाले. 

14:04 March 22

पूनम महाजन यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला

लोकसभेत पूनम महाजन

1200 करोड वर्षाला जमा करत होते.  एपीआयकडून येवढा पैसा घेतला.  तर अन्य लोकांकडून किती पैसे घेत आहेत, असे भाजपाच्या खासदार   पूनम महाजन यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे गृहमंत्री असताना, शिवसेनेला का मिरची लागली. ते कोणाची शिफारस करत आहेत, असेही त्या म्हणाल्या. पळाले पळाले खंडणीखोर आशा घोषणाही भाजपा खासदारांनी दिल्या. राज्यातील ठाकरे सरकार हे तीन चाकी सरकार आहे.  

14:04 March 22

भाजपाचे खासदार कपिल पाटील लोकसभेत

कपिल पाटील लोकसभेत

परमबीर सिंग यांनी लिहलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वीही अधिकाऱ्यांनी असे पत्र लिहले होते. याची चौकशी व्हायला हवी. याप्रकरणी काही नेते रविवारी गृहमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी करत होते. तर आज त्यांनी आपली भूमिका बदलली, असे कपिल पाटील यांनी म्हटलं.  

14:04 March 22

शिवसेनेचे विनायक राऊत यांचे आरोपांना उत्तर

लोकसभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत

गेल्या चौदा महिन्यांत अनेक प्रयत्न करूनही भाजपा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी  सरकार पाडण्यात अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. पोलीस आयुक्तांच्या पत्रावरही गंभीर आरोप असल्याचे त्यांनी म्हटलं. 

14:04 March 22

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा - गिरीश बापट

लोकसभेत गिरीश बापट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आज लोकसभेतही धमाका झाला. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमने सामने आले. गिरीश बापट यांनी लोकसभेत संपूर्ण भाषण मराठीत करत ही मागणी केली. खासदार गिरीश बापट यांनी  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.  महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचं टार्गेट दिलं जात आहे. पोलीसच खंडणी मागत असून त्यांना मंत्र्यांचा आशार्वाद आहे. अशावेळी जनतेने कुणाकडे पाहयचे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली.  

13:14 March 22

खंडणीप्रकरणाचे लोकसभेत पडसाद; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणा, गिरीश बापट आक्रमक

नवी दिल्ली -  महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आज लोकसभेतही पोहोचला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या कारणावरून विरोधक आक्रमक झाले. लोकसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर भाजपा खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला.  

परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन लोकसभेत शिवसेना आणि भाजपा खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. भाजपा खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली. तर दुसरीकडे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावले.  

काय प्रकरण ?  

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीरसिंग यांनी मुख्यमत्री ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी वसुल करण्याचे टार्गेट दिल्याच्या पत्रात म्हटलं आहे.  

Last Updated : Mar 22, 2021, 6:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details