महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Operation Ganga : भारताने 24 तासांत युक्रेनमधून 1300 लोकांना बाहेर काढले - रशिया-युक्रेन युद्ध लेटेस्ट न्यूज

युक्रेनची राजधानी कीववर सध्या संकटाचे ढग ( Russia Ukraine War ) दाटून आले आहेत. अशा परिस्थितीत भारतातील लोकांना कीवपासून दूर नेण्यात आले असून त्यांना शेजारील देशांमार्फत भारतात परत आणले जात आहे. भारताने या मोहिमेला 'ऑपरेशन गंगा' ( Operation Ganga ) असे नाव दिले आहे. गेल्या 24 तासांत भारताने 1377 लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे, ही दिलासादायक बाब आहे.

ऑपरेशन गंगा
Operation Ganga

By

Published : Mar 2, 2022, 12:40 PM IST

Updated : Mar 2, 2022, 2:21 PM IST

नवी दिल्ली -रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Russia Ukraine War ) पुकारल्याने तेथील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. युद्धग्रस्तभूमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना ( Ukraine-Russia conflict ) बाहेर काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. राजधानी कीववर सध्या संकटाचे ढग दाटून आले आहेत. अशा परिस्थितीत भारतातील लोकांना कीवपासून दूर नेण्यात आले असून त्यांना शेजारील देशांमार्फत भारतात परत आणले जात आहे. भारताने या मोहिमेला 'ऑपरेशन गंगा' असे नाव दिले आहे. गेल्या 24 तासांत भारताने 1377 लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे, ही दिलासादायक बाब आहे.

भारतीय हवाई दलाचाही हातभार -

आता भारतीय हवाई दलही या मोहिमेत सामील झाले आहे. आज हवाई दलाची तीन विमाने पोलंड, हंगेरी आणि रोमानियाला रवाना झाली आहेत. ग्लोबमास्टर C17 आज पहाटे 4 वाजता रोमानियाला रवाना झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला या संदर्भात सुचना केली होती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त भारतीयांना मायदेशी परत आणलं जाईल, असं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे. या साठी हवाई दलाच्या सी-17 विमानांचा उपयोग केला जाणार आहे.

'ऑपरेशन गंगा' या मोहिमेअंतर्गत 8 मार्चपर्यंत 46 उड्डाणे -

युक्रेनच्या शेजारील देशांतील भारतीयांना परत आणण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत 26 विमाने उड्डाण करणार असल्याचे भारताने म्हटले आहे. कीवमध्ये आता एकही भारतीय नसल्याचे सरकारने म्हटले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन गंगा’चा आढावा घेण्यासाठी कालही त्यांनी एक बैठक घेतली होती. तिथे अडकलेले भारतीय सुरक्षित रहावे यासाठी संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कार्यरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. 'ऑपरेशन गंगा' या मोहिमेअंतर्गत 8 मार्चपर्यंत 46 उड्डाणे होणार आहेत. त्यापैकी 29 बुखारेस्ट येथून, 10 बुडापेस्ट येथून, 6 पोलंड शहर ग्याझो येथून आणि 1 स्लोव्हाकिया येथून उड्डाण घेईल.

युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ही माहिती दिली. नवीन जी. असं या मुलांचं नाव असून, तो कर्नाटकातल्या हावेरी या गावाचा रहिवासी आहे. मंत्रालयानं नवीन याच्या मृत्यूबद्दल त्याच्या कुटुंबियांना कळवलं असून, तीव्र दुःखही व्यक्त केलं आहे. आपण नवीन याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

हेही वाचा -Drugs Not Found From Aryan : आर्यन खान कडे ड्रग्स सापडतच नसल्याचा एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटीचा अहवाल

Last Updated : Mar 2, 2022, 2:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details