महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Operation Ajay : इस्रायलवरुन दुसरं विमान धडकलं दिल्लीत; 235 भारतीयांना आणलं सुखरुप - भारतीय नागरिक इस्राईलमध्ये अडकले

Operation Ajay : इस्रायल आणि हमासमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धात अडकलेल्या 235 भारतीय नागरिकांना घेऊन दुसरं विमान आज सकाळी दिल्लीत धडकलं. यावेळी दिल्ली विमानतळावर आलेल्या भारतीयांना 'वंदे मातरम्' भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

Operation Ajay
दिल्लीत दाखल झालेले भारतीय नागरिक

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 8:54 AM IST

Updated : Oct 14, 2023, 1:26 PM IST

नवी दिल्ली Operation Ajay : आणि हमास यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामध्ये तब्बल 18 हजार भारतीय नागरिक मध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन अजय ही मोहीम राबवली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत पहिलं विमान भारतात दाखल झाल्यानंतर दुसरं विमानही 235 भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीत धडकलं आहे. त्यामुळे मायभूमीत परतल्यानंतर या नागरिकांना 'वंदे मातरम्'चा जयघोष करुन दिल्ली विमानतळ दणाणून सोडलं आहे.

235 भारतीयांना घेऊन धडकलं विमान : पॅलेस्टाईन युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या युद्धात तब्बल 18 हजार भारतीय नागरिक अडकल्याचं परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या भारतीयांना युद्धभूमीतून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन अजय ही मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार दुसरं भारतीय विमान 235 भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीत दाखल झालं आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे मानले आभार :भारत सरकारच्या वतीनं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कुटनीतीचा वापर करत या भारतीय नागरिकांना पॅलेस्टाईन युद्धातून सुखरुप परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय ही मोहीम राबवली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना सुखरुप भारतात परत आणलं जात आहे. त्यामुळे भारतात परतल्यानंतर या भारतीयांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि भारत सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

विविध राज्याचे प्रतिनिधी विमानतळावर दाखल :वरुन दुसरं विमान भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीत धडकल्यानं भारतीय नागरिकांनी आंद व्यक्त केला आहे. विविध राज्यातील हे नागरिक आणि पॅलेस्टाईन युद्धात अडकले होते. विविध राज्यातील असलेल्या या नागरिकांना घेण्यासाठी त्या-त्या राज्याच्या प्रतिनिधींनी दिल्ली विमानतळावर हजेरी लावली होती. त्यामुळे दिल्ली विमानतलावर पोहोचताच या नागरिकांना त्यांच्या राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी घेऊन आपलं राज्य गाठण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा :

  1. Israel Hamas War : भारताच्या 'ऑपरेशन अजय'ला इस्रायलचं सहकार्य : राजदूत
  2. Israel Hamas War : इस्रायलमधील युद्धाचा अनुभव सांगताना आव्रहम यांना कोसळलं रडू; 'ईटीव्ही भारत'सोबत Exclusive संवाद
Last Updated : Oct 14, 2023, 1:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details