महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तराखंड: हेमकुंड साहिब आणि लक्ष्मण मंदिराचे दरवाजे उघडले, भक्तांनी पवित्र तलावात स्नान केले - हेमकुंड साहिबचे दरवाजे उघडले

आज (२२ मे) सकाळी ९.३० वाजता लोकपाल लक्ष्मण मंदिर आणि गुरुद्वारा हेमकुंड साहिबचे दरवाजे उघडण्यात ( Open doors of Hemkund Sahib ) आले. हेमकुंड साहिब यात्रेबाबत भाविकांमध्ये उत्साह आहे.

Open doors of Hemkund Sahib and Laxman temple
हेमकुंड साहिब आणि लक्ष्मण मंदिराचे दरवाजे उघडले

By

Published : May 22, 2022, 12:46 PM IST

चमोली ( उत्तराखंड ) : समुद्रसपाटीपासून १५२२५ फूट उंचीवर असलेले शीख धर्मीयांचे जगप्रसिद्ध धार्मिक स्थळ हेमकुंड साहिबचे दरवाजे आज (२२ मे) सकाळी ९.३० वाजता पूर्ण विधीने उघडण्यात आले ( Open doors of Hemkund Sahib ) आहेत. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता लोकपाल लक्ष्मण मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.

पंज प्यारांच्या नेतृत्वाखाली दरवाजे उघडले :सकाळी साडेनऊ वाजता हेमकुंड साहिबचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. पंज प्यारांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेनऊ वाजता दरवाजे उघडल्यानंतर दरबार साहिबमध्ये गुरु ग्रंथ साहिबची पूजा करण्यात आली. यानंतर सकाळी 10 वाजता सुखमणीचे पठण करण्यात आले. या वर्षीची पहिली अरदास 11.15 वाजता शब्द कीर्तन आणि दुपारी 12.30 वाजता हेमकुंड साहिब येथे होणार आहे. यावेळी मुख्य विश्वस्त जनक सिंह, गोविंदघाट गुरुद्वाराचे वरिष्ठ व्यवस्थापक सरदार सेवा सिंह, श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे उपाध्यक्ष किशोर पनवार आदी उपस्थित होते.

खोऱ्यात आनंदाचे वातावरण : दोन वर्षांनंतर भव्य स्वरुपात सुरू होणाऱ्या हेमकुंड साहिबच्या यात्रेबाबत भूंदर खोऱ्यात आनंदाचे वातावरण आहे. खोऱ्यातील ग्रामस्थ, गोविंदघाट ते हेमकुंड साहिबच्या बेस कॅम्प घंगारियापर्यंत, हॉटेल-ढाबा, घोडे-खेचर आणि दांडी-कांडीसह इतर व्यावसायिक उपक्रम चालवतात. मात्र, हेमकुंड साहिब पादचारी रस्त्यावरील हिवाळ्यात खराब झालेल्या शौचालयांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा : Panama Couple Marriage : परदेशी जोडप्याने गंगोत्रीमध्ये केले हिंदू पद्धतीने लग्न.. भारतीय संस्कृतीने झाले प्रभावित

ABOUT THE AUTHOR

...view details