महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बेहिशोबी मालमत्ता प्रकरण; हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना कोर्ट आज सुनावणार शिक्षा - ओम प्रकाश चौटाला यांना कोर्ट आज सुनावणार शिक्षा

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी शुक्रवारी 27 मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात ओपी चौटाला यांच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला, यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे.

op chautala
ओम प्रकाश चौटाला

By

Published : May 27, 2022, 11:35 AM IST

नवी दिल्ली - हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी शुक्रवारी 27 मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात ओपी चौटाला यांच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला, यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. यापूर्वी २१ मे रोजी न्यायालयाने दोषी ठरवले होते. गुरुवारी शिक्षेवर झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. आज यावर निर्णय येणार आहे.

प्रतिक्रिया देताना वकील

काय आहे प्रकरण? -गुरुवारी बेहिशोबी प्रकरणातील ओपी चौटाला यांच्या शिक्षेवर सुनावणी होणार होती. ओपी चौटाला हेही व्हील चेअरवर बसून कोर्टात पोहोचले होते. ओपी चौटाला यांच्यावतीने हर्ष कुमार यांनी शिक्षेवरील युक्तीवादादरम्यान आपली बाजू मांडली. चौटाला यांच्यावतीने सांगण्यात आले की, माझे वय ८७ वर्षे असून मी सध्या आजारी आहे. प्रमाणपत्रात मी 90 टक्के अपंग आहे. माझे अपंगत्व 60 ते 90 टक्के झाले आहे. त्यामुळे मी स्वतः कपडे घालू शकत नाही. त्यामुळे माझ्या वयाची आणि अपंगत्वाची काळजी घेतली जावी.

काय म्हणाले सीबीआयचे वकील :चौटाला यांच्यावतीने ९० टक्के अपंगत्व असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर तुमच्याकडे याचे प्रमाणपत्र आहे का, असा सवाल न्यायालयाने केला. चौटाला यांच्या वकिलाच्यावतीने तपासात नेहमीच सहकार्य करणे आणि तुरुंगातून दहावी, बारावीची परीक्षा देणे ही बाबही न्यायालयात सांगण्यात आली. मात्र, या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चौटाला यांना कमी शिक्षा झाली तर चुकीचा संदेश जाईल, असे म्हणत सीबीआयच्या वकिलांनी कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details