महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कलम 370 रद्द केल्यानंतर 'इतक्या' लोकांनी काश्मीरात घेतली जमीन, सरकारने लोकसभेत दिली माहिती - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरबाहेरील केवळ दोन व्यक्तींनीच इथे जमीन खरेदी केल्याची माहिती सरकारने संसदेत दिली. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने मंगळवारी ही माहिती दिली. दरम्यान, ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

कलम 370 रद्द केल्यानंतर 'इतक्या' लोकांनी काश्मीरात घेतली जमीन, सरकारने लोकसभेत दिली माहिती
कलम 370 रद्द केल्यानंतर 'इतक्या' लोकांनी काश्मीरात घेतली जमीन, सरकारने लोकसभेत दिली माहिती

By

Published : Aug 10, 2021, 6:42 PM IST

नवी दिल्ली : कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरबाहेरील केवळ दोन व्यक्तींनीच इथे जमीन खरेदी केल्याची माहिती सरकारने संसदेत दिली. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने मंगळवारी ही माहिती दिली. दरम्यान, ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

लोकसभेत दिली माहिती

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाच्या लिखीत उत्तरात ही माहिती दिली. डिएमकेचे खासदार एस रामलिंगम यांनी याविषयी प्रश्न विचारला होता. कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मीरात कुणी प्रॉपर्टी विकत घेतली असा प्रश्न त्यांनी विचारला होता. काश्मीरात प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला होता. मात्र अशा काही अडचणी आल्याचे अजूनपर्यंत तरी समोर आले नसल्याचे राय यांनी उत्तरात सांगितले.

ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 केले होते रद्द

केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करत जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते. कलम 370 नुसार जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला होता.

हेही वाचा -श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला, 3 जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details