नवी दिल्ली - हज यात्रेची तयारी करणार्या भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा 2021 साठी कृती आराखडा जाहीर केला आहे. तथापि, यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात काही बदल केले गेले आहेत. त्याची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्याचबरोबर कोविड - 19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन हज दरम्यानही करावे लागेल.
हेही वाचा -दिल्लीतील हवेचा स्तर पुन्हा खालावला, गुणवत्ता निर्देशांक 443पर्यंत वाढला
सध्या 7 नोव्हेंबरपासून ऑनलाईन हज यात्रेसाठी अर्ज केले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी आहे. पहिला हप्ता जमा करण्याची शेवटची तारीख 1 मार्च असेल. पैसे जमा करण्याची शेवटची तारीख एप्रिल 2021 मधील असेल.