तिरुवनंतपुरम (केरळ) - देशातील आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत केरळ हे एकमेव राज्य ठरणार आहे जिथून विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना सर्व मते मिळतील. ( Yashwant Sinha in Kerala ) कारण, येथून भाजप किंवा मित्रपक्षांचे एकही आमदार, खासदार नाहीत. अशा स्थितीत 18 जुलै रोजी एलडीएफ आणि यूडीएफचे प्रत्येकी एक मत यशवंत सिन्हा यांना जाईल. सीपीएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफकडे 99 आमदार आहेत आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफकडे 41 आमदार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांनी केरळमधून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. केरळचे उद्योगमंत्री पी. राजीव यांनी माजी केंद्रीय मंत्री यांचे विमानतळावर स्वागत केले. ( Government of Kerala supports Yashwant Sinha ) भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी नेते यशवंत सिन्हा यांनी बुधवारी केरळमधून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी तिरुअनंतपुरममध्ये (LDF) आणि (UDF) या दोन्ही पक्षांच्या आमदारांची वैयक्तिक भेट घेतली.