महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Encounter with Militants : जम्मूत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद, इतर 3 जण जखमी - सुरक्षा दलाचा एक जवान शहीद

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) जम्मू दौऱ्यावर जाणार आहेत पण त्या आधी, जिल्ह्यातील जलालाबाद सुंजवान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये शुक्रवारी चकमक (Terrorists - clash with security forces) सुरू झाली. यात सुरक्षा दलाचा एक जवान शहीद (One security force personnel killed) तर इतर 3 जण जखमी झाले ( 3 more injured) आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला मात्र तो परतवुन लावण्यात आला आहे.

encounter with Militants
दहशतवाद्यांशी चकमक

By

Published : Apr 22, 2022, 9:19 AM IST

जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू दौऱ्यावर जाणार आहेत. पण त्या आधी, जिल्ह्यातील जलालाबाद सुंजवान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये शुक्रवारी चकमक सुरू झाली. सध्या या भागात "गोळीबार सुरू आहे यात दोन स्थानिक अतिरेकी असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरवातीला झालेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे," असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. प्राप्त माहितीनुसार या चकमकीत सुरक्षा दलाचा 1 जवान शहीद झाला असुन इतर 3 जण जखमी झाले आहेत.

सुंजवान परिसरात सैन्याच्या संयुक्त पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. जम्मूतील सुंजवान मिलिटरी स्टेशनवर फेब्रुवारी २०१८ मध्ये जैश ए मुहम्मदच्या तीन अतिरेक्यांनी हल्ला केला होता. हल्ल्यादरम्यान सहा सैनिक आणि एक नागरिक ठार झाले होते. सध्या जम्मूच्या विविध भागांत इंटरनेट बंद करण्यात आले आहे. तसेच सुंजवान भागातील जवळपासच्या शाळा बंद राहणार आहेत.

तर दुसऱ्या एका घटनेत जम्मूतील चड्डा कॅम्पजवळ 15 सीआयएएफ जवानांना ड्युटी साठी घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी पहाटेच हल्ला केला. जवानांनी हा दहशतवादी हल्ला प्रभावीपणे प्रत्युत्तर देत परतवुन लावला आहे. जवानांनी हल्ला परतवुन लावल्यामुळे दहशतवाद्यांना पळून जावे लागले.

ABOUT THE AUTHOR

...view details