महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cheetah helicopter crashed: अरुणाचल प्रदेशात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिकाचा मृत्यू - लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले

Cheetah helicopter crashed: अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात आज भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात एका पायलटला जीव गमवावा लागला. Army Cheetah helicopter crashed

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Oct 5, 2022, 1:10 PM IST

Updated : Oct 5, 2022, 2:40 PM IST

इटानगर (अरुणाचलप्रदेश): Cheetah helicopter crashed: अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात आज भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात एका पायलटला जीव गमवावा लागला. लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव असे पायलटचे नाव असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू आहेत. Army Cheetah helicopter crashed

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

ही घटना सकाळी 10 च्या सुमारास नियमित विमान प्रवासादरम्यान घडली. दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव असे पतलाटचे नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर जामिथांग सर्कलच्या बीटीके भागाजवळ न्यामजंग चू येथे कोसळले. 5 व्या पायदळ तुकडीचे जनरल ऑफिसर कमांडिंग वगळता हे चित्ता हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागातून येत होते.

Last Updated : Oct 5, 2022, 2:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details