महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bomb Blast in Imphal : इंफाळमध्ये दुर्गा मंदिराजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट.. - इंफाळमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात एक जखमी

शुक्रवारी संध्याकाळी इंफाळ पूर्वेतील तेल्लीपाटी येथील दुर्गा मंदिराजवळ झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात ( Bomb Blast in Imphal ) किमान एक नागरिक जखमी झाला.

Bomb Blast in Imphal
इंफाळमध्ये दुर्गा मंदिराजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट

By

Published : May 14, 2022, 1:42 PM IST

गुवाहाटी (आसाम ) : शुक्रवारी संध्याकाळी इंफाळ पूर्वेतील तेल्लीपाटी येथील दुर्गा मंदिराजवळ झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान एक नागरिक जखमी ( Bomb Blast in Imphal ) झाला. जखमी व्यक्तीचे नाव सुबार प्रसाद (वय 3०) असे असून, त्याला वैद्यकीय उपचारासाठी इंफाळ येथील जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, जेएनआयएमएस येथे दाखल करण्यात आले.

पोलिसांनी घेतला आढावा :सुबर प्रसाद यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. बॉम्बस्फोटाची बातमी मिळताच, आयजीपी थेमथिंग मशांगवा यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर पोलिसांचे एक पथक आणि पोलिस अधीक्षक, इंफाळ पूर्व यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्फोटाचा आढावा घेतला. स्फोटानंतर आजूबाजूच्या ठिकाणी राहणारे लोक बाहेर आले आणि त्यांनी स्फोटाच्या विरोधात प्रतिक्रिया दिली. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

हेही वाचा : VIDEO : इंफाळ येथे झालेला बॉम्बस्फोटाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

ABOUT THE AUTHOR

...view details