हिसार - सोनाली फोगाट हत्या प्रकरणात Sonali Phogat murder case गोवा पोलीस अधिक तपासासाठी हिसारला गेले आहेत. हिसार पोलिसांनी या प्रकरणात शिवम नावाची व्यक्ती ताब्यात घेतल्याची माहिती हिसारचे एसएचओ मनदीप चहल यांनी दिली आहे. तो यूपीच्या मेरठ-गाझियाबाद भागात होता. आम्ही त्याची अधिक चौकशी करत आहोत, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. शिवाय गोवा पोलीस आणि हरियाणा पोलीस सोनाली फोगाटच्या फार्म हाऊसवर जाऊन चौकशी करणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
आधी हृदयविकाराचा झटका नंतर म्हटले खून - उल्लेखनीय म्हणजे 23 ऑगस्टच्या सकाळी सोनाली फोगटचा गोव्यातील अंजुना येथील हॉटेलमध्ये मृत्यू झाला. डॉक्टरांनी सुरुवातीला हार्ट अटॅकने मृत्यू असा अंदाज वर्तवला होता. मात्र, सोनालीच्या कुटुंबीयांनी पीए सुधीर सांगवान यांच्यावर हत्येचा आरोप करत मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले होते. सोनाली फोगटच्या भावाच्या वतीने गोवा पोलिसांना लेखी तक्रार देण्यात आली होती. ज्यामध्ये सुधीर सांगवान यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.
सीबीआय तपासाची मागणी - सोनाली फोगट खून प्रकरणाच्या तपासात गोवा पोलिसांचा सहभाग असून आतापर्यंत या प्रकरणात एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. सोनालीचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्याशिवाय दोन ड्रग्ज तस्कर आणि क्लबचे मालक सध्या पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणी हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दुसरीकडे सोनाली फोगटचे कुटुंबीय या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. याबाबत कुटुंबीयांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचीही भेट घेतली आहे. त्याचवेळी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र हरियाणा सरकारकडून सीबीआय चौकशीची विनंती केल्यास त्यावर विचार केला जाईल.