बगहा: बिहारमधील बगहामध्ये काल रात्री एका वाघाने एका व्यक्तीची शिकार केली (Tiger Hunted Man in Bagaha). हे प्रकरण रामनगर मधील डुमरी (गोबरधन) येथील आहे. संजय महतो (३५ वर्षे) हे शौचासाठी शेतात गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. बगहा पंचायतीच्या सिंघाही गावात गुरुवारीच एका नरभक्षक वाघाने (man eating tiger) १२ वर्षांच्या मुलीला ठार मारले होते. गेल्या महिनाभरात वाघाने आतापर्यंत सात जणांना आपली शिकार बनविले आहे. सततच्या पावसामुळे वाघाला पकडण्यात अडचणी येत आहेत. सध्या बगाहातील अनेक भाग जलमय झाले आहेत.
वनविभागाविरोधात नागरिकांमध्ये रोष:संजय महातो शौचासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्याची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांची मान मोडली होती आणि वाघाचे दात त्याच्या घशात गेले होते. अतिरक्तस्त्राव आणि श्वासोच्छवास तसेच मान तुटल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेनंतर वनविभागाविरोधात नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. स्थानिक लोकांनी वनविभागाच्या वाहनांची तोडफोड केली. सध्या त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येत आहे. नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात एकापाठोपाठ एक मृत्यू होत असल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. 400 वनकर्मचाऱ्यांचे पथक वाघाला पकडण्यासाठी गुंतले आहे. गुरुवारीच एका नरभक्षी वाघाने एका किशोरवयीन मुलाची शिकार केली होती.