महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसला पुन्हा धक्का; पुद्दुचेरीत आणखी दोन आमदारांचा राजीनामा - Puducherry govt crisis

पुद्दुचेरी काँग्रेस सरकारसमोरील अडचणींमध्ये वाढ होत आहे. आज पुन्हा एका काँग्रेस आणि डीएमके आमदाराने राजीनामा दिला आहे. लक्ष्मी नारायण असे काँग्रेस आमदाराचे नाव आहे. तर वेंकटेशन असे डीएमके आमदाराचे नाव आहे. यामुळे काँग्रेस सरकार अल्पमतात आले आहे.

Puducherry
पुद्दुचेरी

By

Published : Feb 21, 2021, 4:12 PM IST

Updated : Feb 21, 2021, 5:14 PM IST

पुद्दुचेरी - येत्या काही महिन्यांत पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. पुद्दुचेरी काँग्रेस सरकारसमोरील अडचणींमध्ये वाढ होत आहे. आज पुन्हा काँग्रेस आणि डीएमके आमदाराने राजीनामा दिला आहे. लक्ष्मी नारायण असे काँग्रेस आमदाराचे नाव आहे. तर वेंकटेशन हे डीएमके आमदाराचे नाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांच्यासमोर 22 फेब्रुवारी म्हणजे उद्या बहूमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे.

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले होते. तर काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या डीएमके पक्षाच्या एका आमदाराने राजीनामा दिला. 33 सदस्य असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत आता काँग्रेस सरकारकडे केवळ 12 आमदार राहिले आहेत. अल्पमतात आलेलं काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक -

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळविला होता. तर काँग्रेसची सहकारी असलेल्या डीएमकेने 3 जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 16 आहे.

काँग्रेस सरकारकडे 12 आमदार ( विधानसभा सदस्य संख्या 33)

काँग्रेस - 9 ( काँग्रेसकडे 15 आमदार होते, पाच आमदारांनी राजीनामा दिलाय. तर एक आमदार आयोग्य घोषित)

डीमके - 2 (3 पैकी एकाचा राजीनामा)

अपक्ष आमदार - 1

विरोधकांकडे - 14 संख्याबळ

एआयएनआर - 7

एआयएडीएमके - 4

भाजपा - 3

Last Updated : Feb 21, 2021, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details