श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते जसबीर सिंग यांच्या निवासस्थानी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. तर जसबीर सिंग यांच्या घरातील इतर चार सदस्यही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
वीरचा राजौरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की मुलाचा मृतदेह अंतिम संस्कारांसाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
भाजपाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि त्याला जबाबदार असणाऱ्यांना त्वरित अटक करण्याचे पोलिसांना आवाहन केले. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी आणि भाजपा नेत्याच्या कुटुंबीयांनी आंदोलन केले. सिंग यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. जसबीर सिंग या घटनेत जखमी झाले आहेत.