जोहान्सबर्ग:पुढील महिन्यापासून टी-20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022 ) सुरु होत आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 13 नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला टी-20 विश्वचषक 2022 ( ICC T20 World Cup 2022 ) होणार आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 15 वर्षांपूर्वी या दिवशी (24 सप्टेंबर) भारताने 2007 चा टी-20 विश्वचषक अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून जिंकला होता. धोनाच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच टीम इंडियाने कोणत्याही आयसीसी ट्रॉफीवर कब्जा ( India won the T20 World Cup 2007 ) केला. 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सत्राची सुरुवात टीम इंडियासाठी खूपच मनोरंजक होती.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना सुटला होता बरोबरीत
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमने-सामने आले, तेव्हा या सामन्याचा निर्णय अगदी अनोख्या पद्धतीने झाला. 14 सप्टेंबर 2007 रोजी डरबनच्या किंग्समीड मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शोएब मलिकने ( Captain Shoaib Malik ) नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 20 षटकांत 9 गडी गमावून 141 धावा करता आल्या. या सामन्यात रॉबिन उथप्पाने अर्धशतक झळकावले.
त्याचवेळी टीम इंडियाने पाकिस्तानला 141 धावांत गुंडाळले. त्यामुळे हा सामना बरोबरीत संपला. सामना बरोबरीत सुटल्यानंतर बॉल आऊटचा सामना ( A ball out match ) घेण्यात आला. दोन्ही संघांना स्टंप नेमण्यासाठी पाच खेळाडूंची निवड करावी लागली. ज्या संघाने पाचपैकी सर्वाधिक स्टंपला नेमले, तो संघ सामना जिंकणार होता.