महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tajuddin Baba संत ताजुद्दीन बाबांची पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास - Sant Tajuddin Baba

येत्या 25 ऑगस्ट गुरुवार रोजी संत ताजुद्दीन बाबा Sant Tajuddin Baba यांची पुण्यतिथी death anniversary आहे. कोण आहेत संत ताजुद्दीन बाबा, नागपूर शहराशी त्यांचा काय संबंध होता, आणि कसे होते त्यांचे जीवन life journey जाणुन घेऊया.

Tajuddin Baba
संत ताजुद्दीन बाबा पुण्यतिथी

By

Published : Aug 21, 2022, 6:10 PM IST

Updated : Aug 24, 2022, 12:12 PM IST

येत्या 25 ऑगस्ट गुरुवार रोजी संत ताजुद्दीन बाबा Sant Tajuddin Baba यांची पुण्यतिथी death anniversary आहे. कोण आहेत संत ताजुद्दीन बाबा, नागपूर शहराशी त्यांचा काय संबंध होता, आणि कसे होते त्यांचे जीवन life journey जाणुन घेऊया.

ताजुद्दीन बाबांचा इतिहासहजरत ताजुद्दीन बाबा हे इतर सर्व आध्यात्मिक व्यक्तींप्रमाणेच होते. त्यांना त्यांच्या करुणेसाठी ओळखले जायचे. त्यांच्याकडे सतत श्रीमंत आणि गरीब लोक सांसारिक दु:खाच्या निवारणासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असे. संत ताजुद्दीन बाबा यांनी कधीही कुठलीही भौतिक सुखाची इच्छा केली नाही.

ताजुद्दीन बाबांचा जन्म जानेवारी १८६१ रोजी महाराष्ट्र राज्यातील नागपूरजवळील कामठी येथे झाला. ते मेहेर बाबांच्या पाच परफेक्ट मास्टर्सपैकी एक होते. ताजुद्दीन बाबांचा जन्म असामान्य मुलगा म्हणून झाला होता. त्यांनी लहान वयातच आपले आई वडील गमावले होते. त्यांचे काका अब्दुल रहमान यांनी त्यांची काळजी घेतली होती.

कामठी येथे शाळकरी म्हणून शिकत असताना, ते अध्यात्मिक गुरु हजरत अब्दुल्ला शाह यांच्या संपर्कात आले. त्यांनी ताजुद्दीन बाबांमधील आध्यात्मिक क्षमता लगेच ओळखली. पुढे 1881 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी ते नागपूर आर्मी रेजिमेंटमध्ये शिपाई म्हणून रुजू झाले. त्यांची पोस्टींग सागरला येथे केल्यानंतर, बाबांनी आपला बहुतेक वेळ सागरच्या प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्ती हजरत बौद साहेबांसोबत घालवला.

त्यानंतर हजरत बौद साहेब अशा प्रकारे हजरत ताजुद्दीन बाबांचे आध्यात्मिक गुरु झाले. हजरत बौद साहेबांसोबत अधिकाधिक वेळ घालवत असल्यामुळे, त्यांच्या नौकरीवर त्याचाल परिणाम झाला आणि अखेरीस त्यांनी राजीनामा दिला.

देवासोबतच्या त्यांच्या एकरूपतेमुळे त्यांना त्याच्या सभोवतालच्या जगाची जाणीव होत नव्हती. ते इतरत्र कुठेही फिरु लागले. ही बाब त्यांच्या नातेवाईकांना समजताच, त्यांनी ताजुद्दीन बाबा यांना परत घरी आणले. त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे, असे समजुन घरचे लोक त्यांच्यावर सर्व औषधोपचार आणि विविध डॉक्टरांचे प्रयत्न करु लागले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. ताजुद्दीन संपूर्ण जीवनभर अवलियाच्या अवस्थेत राहिले. त्यांच्या अवलियाच्या स्थितीतील चमत्कारांच्या कथा पसरल्या आहे. हजरत ताजुद्दीन बाबांचा महिमा नागपूर शहरातून इतरत्र पसरला, कारण ते नागपुरात शहराबाहेर अनेक ठिकाणी दिसले.

1925 ला जेव्हा बाबा सुमारे 65 वर्षांचे होते, तेव्हा त्यांची तब्येत लक्षणीयरीत्या खालावली. ताजुद्दीन बाबांचे भक्त असलेले महाराजा राघोजी राव यांनी बाबांवर उपचार करण्यासाठी नागपूरच्या सर्वोत्तम डॉक्टरांची सेवा घेतली, परंतु काही उपयोग झाला नाही. अखेरिस ऑगस्ट 1925 रोजी बाबांनी देह त्यागला. मात्र त्यांच्या आर्शिवादाने ज्यांचे कल्याण झाले,त्या सर्व भक्तांच्या ते सदैव स्मरणात राहतील.

आजही नागपूर जिल्हयातील वाकी येथे संत ताज्जुदिन बाबा यांची समाधी आहे. आजही अनेक श्रध्दाळु तेथे दर्शनासाठी जातात. तर असे म्हणतात की, ताजुद्दीन बाबां हे अवलियाच्या असस्थेत असतांना त्यांच्या कुटुंबातील लोकांनी त्यांना मानसिक रुग्ण समजुन मानकापूर येथील मानसिक रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथे त्यांनी आपल्या करुणेनी अनेक रुग्णांना बरे केले. अनेकांच्या परिवारातील अडचणी दूर केल्यात. त्यामुळे आजही मानकापूर मानसिक रुग्णालय येथे संत ताज्जुदिन बाबा यांचा दर्गा आहे, असे मानले जाते.

हेही वाचाBHAGWAT GEETA आजची प्रेरणा, दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

Last Updated : Aug 24, 2022, 12:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details