भोपाळ - मधुचंद्राच्या रात्रीला नववधूने वराला तिच्या आयुष्याशी संबंधित गोपनीय माहिती ( On golden night bride told truth ) सांगितली. त्यामुळे त्यांचे नाते संपुष्टात आले. लग्नापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे वधूने वराला ( bride told to groom her rape ) सांगितले. दुसऱ्याच दिवशी पतीने पत्नीला तिच्या माहेरच्या घरी सोडले. यानंतर कौटुंबिक न्यायालयात विवाह रद्द ठरवण्याचा अर्ज दाखल करण्यात आला. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात तीन वर्षे चालले. यानंतर न्यायालयाने विवाह रद्द ठरवण्याचे आदेश दिले.
खरे तर या प्रकरणात न्यायालयाने तरुणाच्या पत्नीला आपली बाजू मांडण्यासाठी अनेकवेळा नोटिसा पाठवल्या. मात्र वधू आपली बाजू मांडण्यासाठी कधीच पुढे आली नाही. त्यानंतर न्यायालयाने हे लग्न अवैध ठरवले.
सत्य ऐकून वराला बसला धक्का- ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचे २०१९ मध्ये शहरातच राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर मधुचंद्रामध्ये पत्नीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से सांगितले. यावेळी तिने कटू सत्य सांगितले. हे ऐकून तिच्या पतीला धक्का बसला. लग्नापूर्वी आपल्यावर बलात्कार झाल्याचे पत्नीने पतीला सांगितले. हे ऐकून पतीला धक्काच बसला आणि त्याने हा प्रकार घरच्यांना सांगितला.