नवी दिल्ली - हत्तीने कामगाराला चिरडून ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील मोरोंगी चहाच्या मळ्यात घडली आहे.
चहाच्या मळ्यात काम करून कामगार घरी परतत होते. तेव्हा त्यांना हत्तींचा कळप दिसता. तेव्हा काही कामगारांनी त्या हत्तींचा पाठलाग गेला. तेव्हा एक हत्ती त्यांच्यावर धावून गेला. घाईने पळताना एक कामगार खाली पडला. तेव्हा संतप्त हत्तीने त्याला पायाने तुडविले. काही वेळानंतर हत्ती तेथून गेल्यानंतर कामगार तिथे पोहोचले. त्यांनी जखमी कामगाराला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कामगाराला मृत घोषित केले. अनेक वर्षांपासून आसासममध्ये हत्ती आणि माणसांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसून आले आहे.
संबंधित बातमी वाचा-VIDEO : अन् रस्त्यावर आला हत्तींचा कळप; लोकांना पळता भुई थोडी..