भुवनेश्वर (ओडिशा) : चीनमध्ये ज्या ओमिक्रॉनच्या विषाणू BF 7 ची (Omicron New Variant BF 7) लाट आली आहे, त्याचे आतापर्यंत किमान तीन प्रकरणे भारतात आढळली आहेत. यातील एक प्रकरण आता ओडिशात आढळले आहे. (BF 7 Detected In Odisha). भारतात BF 7 चे पहिले प्रकरण गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे ऑक्टोबरमध्ये आढळून आले. आतापर्यंत, गुजरातमध्ये दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर ओडिशातून एक प्रकरण नोंदवले गेले आहे.
Omicron New Variant BF. 7 : आता ओडिशात आढळला ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट - BF 7 Detected In Odisha
गुजरात पाठोपाठ आता ओडिशात देखील ओमिक्रॉनच्या नव्या BF 7 विषाणूचे प्रकरण (Omicron New Variant BF 7) आढळले आहे. (BF 7 Detected In Odisha). ओमिक्रॉनचा हा विषाणू अत्यंत संक्रामक आहे. या व्हेरियंटमुळे लसीकरण केलेल्यांना देखील पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
चीनमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग : बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत तज्ञांनी सांगितले की, कोविड केसलोडमध्ये सध्या कोणतीही वाढ झाली नसली तरी विद्यमान प्रकारांचा मागोवा ठेवण्यासाठी सतत देखरेखीची आवश्यकता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी शहरांना सध्या ओमिक्रॉनच्या अतिसंक्रमणाचा फटका बसला आहे. मुख्यतः BF.7 जो बीजिंगमध्ये पसरणारा मुख्य प्रकार आहे, तो त्या देशात कोविड संसर्गाच्या मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास हातभार लावतो आहे. चीनमध्ये BF.7 ची उच्च संक्रामकतेचे कारण हे पूर्वीच्या संसर्गापासून चिनी लोकांमध्ये असलेल्या कमी प्रतिकारशक्ती हे असू शकते.
अनेक देशात आधीच आढळला : BF.7 हा ओमिक्रॉनचा विषाणू BA.5 चा उप-वंश आहे. ओमिक्रॉनचा हा विषाणू अत्यंत संक्रामक आहे. या व्हेरियंटमुळे लसीकरण केलेल्यांना देखील पुन्हा संसर्ग होऊ शकतो. अमेरिका तसेच इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन राष्ट्रांमध्ये हा व्हेरियंट आधीच आढळला होता.