नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या तिसरी लाट येण्ऱ्याची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. (Union Health Ministry) त्यांनी स्पष्ट केले आहे की, दक्षिण अफ्रीके शिवाय इतर देशांमधुन ओमायक्राॅनचे (Omicron) रूग्ण मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. त्याची लक्षणे पाहता तो भारतासह (corona virus new variant in India) इतर देशामधे पसरण्याची शक्यता आहे. पण, कोणत्या स्तरावर रूग्ण वाढतील आणि त्याची तीव्रता काय असेल या बाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
प्रतिकारशक्ती वर होणाऱ्या पुराव्याची वाट
भारतात यशस्वी झालेली लसीकरण मोहिम आणि याआधि आलेल्या डेल्टा व्हेरीयंटचा प्रभाव पाहता या रोगाची गंभीरता कमी राहण्याची शक्यता आहे. या बद्दल अद्याप तज्ञांकडून कोणताही अंदाज व्यक्त करण्लेयात आलेला नाही.ओमायक्राॅनवर सध्याची लस काम करत नाही असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. लसीची परीणामकारकता कमी होण्याची शक्यता समोर येऊ शकते. रोगाच्या या नव्या स्वरूपामुळे प्रतिकारशक्ती वर होणाऱ्या पुराव्याची वाट पाहत आहोत.
लसीची परीणामकारकता कमी होउ शकते
मंत्रालयाने ओमायक्राॅनच्या स्वरूपा बाबत कायम विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी जाहिर केली आहे, जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाला चिंताजनक श्रेणीत टाकले आहे.आणि भारतातही संशयीत सापडत आहेत. सध्याचे लसीकरण ओमायक्राॅनशी लढण्यास समर्थ आहे का हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे या बद्दल मंत्रालयाने म्हणले आहेकी, लस काम करत नाही असे कोणताही शोध अद्याप समोर आलेला नाही. पण लसीची परीणामकारकता कमी होउ शकते.