महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Omicron in India : ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू तर तेलंगणामध्ये निर्बंध - ओमायक्रॉन रुग्ण संख्या लेटेस्ट न्यूज

ओमायक्रॉन या ( Omicron in India ) व्हेरिएंटने खळबळ उडवून दिली आहे. देशात आतापर्यंत जवळपास 300 ओमायक्रॉन रुग्णांची ( Omicron cases in India ) नोंद झाली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग पसरू नये, म्हणून अनेक राज्यांनी लॉकडाऊन, निर्बंध आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातदेखील नाईट कर्फ्यू लागू करण्याची शक्यता आहे. तर तेलंगणामध्ये काही ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत.

Omicron
ओमायक्रॉन

By

Published : Dec 24, 2021, 12:51 PM IST

Updated : Dec 24, 2021, 1:37 PM IST

नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोना लसीकरणानंतर परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येत होती. मात्र, यातच पुन्हा कोरोनाच्या ओमायक्रॉन या ( Omicron in India ) व्हेरिएंटने खळबळ उडवून दिली आहे. देशात आतापर्यंत जवळपास 300 ओमायक्रॉन रुग्णांची ( Omicron cases in India ) नोंद झाली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग पसरू नये, म्हणून अनेक राज्यांनी लॉकडाऊन, निर्बंध आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातदेखील नाईट कर्फ्यू लागू करण्याची शक्यता आहे. तर तेलंगणामध्ये काही ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत.

रुग्णांची वाढती संख्या पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( PM Modi on Omicron cases ) गुरुवारी आरोग्य पायाभूत सुविधा आणि कोरोना नियंत्रण आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठक घेतली.

महाराष्ट्रातदेखील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरवारी महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या ओमायक्रॉनची 23 प्रकरणे नोंदवली गेली असून एका दिवसात इतके रुग्ण आढळण्याचा हा आत्ता पर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 88 वर पोहचली आहे.

उत्तर प्रदेशात कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश -

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, उत्तर प्रदेशमध्ये कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे निर्देश प्रशानसाने दिले आहेत. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त लोकांना सहभागी होण्याची परवानगी नाही. तसेच एखादा कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांची माहिती अगोदर प्रशानसाला देणे बंधनकारक केले आहे. तसेच कोरोना परिस्थिती पाहता अलाहाबाद उच्च न्यायालयाने यूपी विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाला केली आहे.

मध्य प्रदेशात नाईट कर्फ्यू लागू -

मध्य प्रदेशात गुरवार रात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना पसरू नये म्हणून भारत सरकारने नियमावली जारी केली आहे. मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि विनाकारण गर्दी जावू नका आणि लस टोचवून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.

तेलगंणामधील परिस्थिती -

ओमिक्रॉनची लाट पाहता तेलंगणातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक गावांमध्ये ऐच्छिक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ओमायक्रॉनची रुग्ण वाढू नये, म्हणून ग्रामस्थानी हा निर्णय घेतला आहे. तेलंगणामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनची 38 रुग्ण आढळली आहेत. यापैकी एकही रुग्ण अद्याप बरा झालेला नाही.

हेही वाचा -Fresh Guidelines : सावधान! सरकार आज जारी करणार नवी नियमावली

Last Updated : Dec 24, 2021, 1:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details