श्रीनगर -"मला आणि माझ्या कुटुंबीयांना सरकारने गृहकैदेत ठेवल्याचा दावा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष आणि जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. वडील फारुख अब्दुल्लांनाही गृहकैदेत ठेवल्याचे ते म्हणाले आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर अनेक नेते गृहकैदेत होते. मात्र, आता सर्वांना मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा सरकारवर गृहकैदेत ठेवल्याचा आरोप केला आहे.
नव्या काश्मिरातील नवी लोकशाही -
ओमर अब्दुल्ला यांचे ट्विट ऑगस्ट २०१९ हा नंतर हा नवा जम्मू काश्मीर आहे. कोणत्याही कारणास्तव आम्हाला घरात कैद करुन ठेवले आहे. माझे वडील विद्यमान खासदार असून त्यांना आणि मला घरात कैद केल्याची कृती अत्यंत वाईट आहे. माझी बहीण आणि तिच्या मुलांनाही घरात बंदिस्त करून ठेवले आहे, असा आरोप ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. श्रीनगर शहरातील गुपकर मार्गावर ओमर अब्दुल्ला यांचे निवास्थान आहे. येथील घराबाहेर पोलिसांची वाहने उभी असल्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. घरामध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही आत येऊ देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'चला, तुमच्या लोकशाहीच्या नव्या व्यवस्थेत तुम्ही कोणालाही विना कारण घरात डांबून ठेऊ शकता. त्यावर कळस म्हणजे घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आत येऊ देत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.