नवी दिल्ली - हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना सीबीआय कोर्टाने ( om prakash chautala convicted ) 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शिक्षा जाहीर केली. याशिवाय न्यायालयाने चौटाला यांना ५० लाखांचा ( Om Prakash Chautla )दंडही ठोठावला आहे. ओमप्रकाश चौटाला यांच्या चार मालमत्ता जप्त करण्याचे ( Om Prakash Chautala sentenced to four years ) आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
उल्लेखनीय आहे की 21 मे रोजी सीबीआय न्यायालयाने चौटाला यांना या प्रकरणी दोषी ( op chautala sentenced to 4 years ) ठरवले होते . त्यानंतर गुरुवारी कोर्टात चौटाला यांच्या शिक्षेबाबत न्यायालयात युक्तीवाद झाला. चौटाला यांच्या वतीने ९० टक्के अपंगत्व आणि आजारांचा दाखला देत न्यायालयाला नम्रतेचे आवाहन करण्यात आले. तर सीबीआयने चौटाला यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
गेल्यावर्षीच तुरुंगातून झाली होती सुटका-87 वर्षीय ओम प्रकाश चौटाला यांना गेल्या वर्षी हरियाणातील जेबीटी भरती घोटाळ्यात शिक्षा भोगल्यानंतर तिहार तुरुंगातून सोडण्यात आले होते. आता ओमप्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.