नागौर (राजस्थान): Om Mathur: माजी राज्यसभा खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ओम माथूर यांनी नागौरमध्ये मोठे वक्तव्य केले आहे. माथूर म्हणाले की, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्या निकटवर्तीयांची तिकिटे कापू शकत नाहीत. माथूर हे जनआक्रोश रॅलीला संबोधित करण्यासाठी जिल्ह्यातील परबतसर विधानसभा मतदारसंघात पोहोचले BJP Jan Aakrosh Yatra in Nagaur होते. त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी हे विधान केले. ज्याचे तिकीट ते एकदाच फायनल करतील ते स्वतः पंतप्रधान नरेंद्रही तिकिट रद्द करू शकत नाहीत, असे माथूर BJP Senior Leader Om Mathur Challenged PM Modi म्हणाले. त्यांच्या या खुल्या व्यासपीठावरून केलेल्या वक्तव्यानंतर प्रदेश भाजपमध्ये नाराजी पसरली Politics heats up on Om Mathur statement आहे.
ओम माथूर इथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले की, यादी जयपूरहून आली की दिल्लीतून. मी नाव दिल्यावर त्याला कोणीही हलवू शकत नाही. ओम माथूर यांच्या या वक्तव्याबाबत भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. माथूर यांच्या या विधानाचे अनेक अर्थ खुल्या मंचावरून काढले जात आहेत. यासोबतच त्यांच्या वक्तव्याला विरोध सुरू झाला आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचे वक्तव्यही व्हायरल होत आहे. ज्याचा थेट परिणाम पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या प्रतिमेवर होत आहे.