साक्षी मलिकची पत्रकार परिषद नवी दिल्ली Sakshi Malik Announced Retirement : भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनं सर्वांना आश्चर्याचा धक्का देत निवृत्तीची घोषणा केलीय. आजच्या नंतर ती खेळताना दिसणार नाही. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी साक्षी ही भारताची पहिली महिला कुस्तीपटू आहे. तिनं अनेक वेळा कुस्तीमध्ये महत्त्वाच्या प्रसंगी देशासाठी पदकं मिळविली आहेत. आता तिनं निवृत्तीची घोषणा करुन संपूर्ण देशवासीयांना आश्चर्यचकित केलंय. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तिनं निवृत्ती जाहीर केलीय.
संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड : संजय सिंह यांची भारतीय महिला कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. विशेष म्हणजे संजय सिंह हे ब्रिजभूषण सिंह यांच्या जवळचे आहेत. एखाद्या महिलेला असोसिएशनचे अध्यक्ष केलं जावं. ब्रिजभूषण यांच्या जवळच्या व्यक्तीला नव्हे, अशी भारतीय कुस्तीपटूंची इच्छा होती. भारतीय महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
साक्षी मलिकनं जाहीर केली निवृत्ती : साक्षी मलिकनं मीडियासमोर येऊन पत्रकार परिषदेत निवृत्ती जाहीर केली. ती म्हणाली, आम्ही लढलो पण तरीही अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यासारखे असतील तर ते चुकीचं आहे. अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या जवळचे असतील तर ते चांगलं नाही. आम्ही महिला अध्यक्षांची मागणी केली होती. पण तीही पूर्ण होऊ शकली नाही. मी आजपासून निवृत्त होत आहे, आता मी पुन्हा कधीही खेळताना दिसणार नाही, असं म्हणताना तिला ढसाढसा रडू कोसळलं.
निवृत्तीची घोषणा करताना साक्षी झाली भावूक : पत्रकार परिषदेत बोलताना साक्षीनं तिचे शूज टेबलावर ठेवले आणि भावूक होऊन ती मीडियासमोर उठली आणि निघून गेली. साक्षी सुरुवातीपासूनच ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलनाचं नेतृत्व करत होती. न्याय मिळवून देण्यासाठी तिनं रात्रंदिवस काम केलं. साक्षी मलिक ही हरियाणातील रोहतकची रहिवासी आहे. ब्रिजभूष सिंह यांच्या विरोधातील आंदोलनाचं ती सुरुवातीपासून नेतृत्व करत होती.
हेही वाचा :
- भारतीय खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी, एक नजर या अप्रतिम प्रवासावर
- राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार, 'या' २ खेळाडूंना मिळाला 'खेलरत्न'