महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Old Man Murdered: शेतातच प्रेमी जोडपे करत होते 'तसले' चाळे.. म्हाताऱ्याने गुपचूप काढले फोटो.. वादानंतर म्हाताऱ्याची हत्या - आसनसोलमध्ये लिंचिंग

आसनसोलमध्ये एका तरुण जोडप्याने लपून फोटो काढणाऱ्या वृद्धाची हत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर हे दाम्पत्य फरार असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Asansol Crime News
आसनसोलमध्ये लिंचिंग

By

Published : Mar 4, 2023, 6:59 AM IST

आसनसोल (प. बंगाल) : पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये एका वृद्धाची लिंचिंग करून हत्या केल्याचा आरोप एका तरुण जोडप्यावर करण्यात आला आहे. आसनसोल दक्षिण पोलीस ठाण्याच्या अराडंगा परिसरात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. अमर सिंग (65) असे मृताचे नाव आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर सिंह गुप्तपणे एका जोडप्याचे फोटो काढत होते. त्यावेळी दाम्पत्य आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना बेदम मारहाण केली. अमर सिंह यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आसनसोल जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहेत.

जोडप्याचे गुप्तपणे फोटो काढत होते : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर सिंह हे तृणमूलच्या कामगार संघटनेचे कार्यकर्ते आहेत. ते गुरुवारी अरडंगा परिसरातील शेतात बसले होते. तेथेच एक तरुण जोडपे देखील बसले होते. अमरसिंग त्या जोडप्याचे गुप्तपणे फोटो काढायला लागले. ते पाहिल्यानंतर तरुणांनी आपल्या मित्रांना तेथे बोलावले. त्यानंतर त्या सर्वांनी अमर सिंह यांना मारहाण केली. या घटनेनंतर घरी परतल्यावर ते आजारी पडले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून तोंडाला फेस येत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

उपचारादरम्यान मृत्यू झाला : या अवस्थेत अमर सिंह यांना आसनसोल जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरसिंह यांच्या कुटुंबीयांनी प्रथम पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. हॉस्पिटलमधून त्यांचा मृतदेह हॉटन रोडवरील दुसऱ्या घरात नेण्यात आला, परंतु हा संपूर्ण प्रकार ऐकून स्थानिक रहिवासी आणि कामगार संघटनेच्या नेत्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची सूचना केली.

आरोपी दाम्पत्य फरार : त्यानंतर अमर सिंह यांच्या पत्नीने आसनसोल दक्षिण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याशिवाय अमर सिंह यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आसनसोल जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर हे दाम्पत्य फरार आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की त्यांच्या मुलीचा या घटनेशी काहीही संबंध नाही. या घटनेच्या निषेधार्थ अराडंगा परिसरात रात्री स्थानिकांनी आंदोलन केले.

हेही वाचा :Telangana Suicide News : सिनीयरला कंटाळून मेडिकल विद्यार्थीनीची आत्महत्या, तर फोटो व्हायरल केल्याने इंजिनिअरिंग विद्यार्थीनीने संपवले जीवन

ABOUT THE AUTHOR

...view details