नवी दिल्ली -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी गुजरातमध्ये सुरत येथे सांगितले की, हिंदी ही त्यांची "मित्रभाषा" आहे. हिंदी देशातील इतर सर्व प्रादेशिक भाषांची प्रतिस्पर्धी भाषा नाही. परंतु, विकासासाठी आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. हिंदीला प्रादेशिक भाषांविरोधात उभे करण्याच्या ‘प्रचाराचा’ शहा यांनी निषेध केला. हिंदीसह स्थानिक भाषांना बळकट करण्यावर भर दिला पाहिजे असही ते म्हणाले आहेत. सुरतमध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषदेला संबोधित करताना शाह बोलत होते. सर्व भाषांचे सहअस्तित्व स्वीकारण्याची गरज आहे. इतर भाषांमधील शब्द घेऊन ते लवचिक बनवून हिंदी शब्दकोशाचा विस्तार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
हिंदी भाषा ही देशाला एकात्मकतेने जोडते -अमित शहा - काय म्हणाले अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी गुजरातमध्ये सुरत येथे सांगितले की, हिंदी ही त्यांची "मित्रभाषा" आहे. हिंदी देशातील इतर सर्व प्रादेशिक भाषांची प्रतिस्पर्धी भाषा नाही. परंतु, विकासासाठी आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. हिंदीला प्रादेशिक भाषांविरोधात उभे करण्याच्या ‘प्रचाराचा’ शहा यांनी निषेध केला. हिंदीसह स्थानिक भाषांना बळकट करण्यावर भर दिला पाहिजे असही ते म्हणाले आहेत.
काही लोक भाषा एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असल्याचा अपप्रचार करत आहेत. हिंदी ही देशातील कोणत्याही भाषेला टक्कर देऊ शकत नाही. हिंदी ही देशातील सर्व भाषांची मित्र आहे हे समजून घेतले पाहिजे असही ते म्हणाले आहेत. देशातील प्रादेशिक भाषा तेव्हाच समृद्ध होऊ शकतात जेव्हा हिंदीचा विकास होईल आणि प्रादेशिक भाषांच्या विकासासोबत हिंदीचाही विकास होईल. प्रत्येकाने हे स्वीकारले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे असही ते म्हणाले आहेत. भाषांचे सहअस्तित्व मान्य केल्याशिवाय आपल्या भाषेत देश चालवण्याचे स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाही.
शाह म्हणाले की, ब्रिटिशांनी हिंदीतील २६४ कविता, उर्दूतील ५८, तमिळमधील १९, तेलुगूमधील १०, पंजाबी आणि गुजरातीतील प्रत्येकी २२, मराठीतील १२३, सिंधीमधील नऊ कवितांसह अनेक भारतीय भाषांमधील साहित्यकृतींवर बंदी घातली होती. ओडियामध्ये 24, बंगालीमध्ये 24 आणि कन्नडमध्ये एक कविता. ते म्हणाले की, अधिकृत भाषा आणि प्रादेशिक भाषांनी स्वातंत्र्य लढ्याला कसे बळ दिले, त्यामुळे ब्रिटिशांना त्यांच्यावर बंदी घालावी लागली, असे ते म्हणाले.