महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राकेश टिकैत यांना अश्लील संदेश, जीवे मारण्याचे धमकीचे फोन - कोण आहेत राकेश टिकैत

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांना व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील व्हिडिओ पाठवले जात आहेत. इतकेच नाही तर त्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

राकेश टिकैत
राकेश टिकैत

By

Published : May 22, 2021, 7:04 PM IST

नवी दिल्ली - भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांना व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील व्हिडिओ पाठवले जात आहेत. इतकेच नाही तर त्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. यासंदर्भात राकेश टिकैत यांनी गाझियाबादमधील कौशांबी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

राकेश टिकैत यांच्या फोटोसोबत छेडछाड करत अश्लील व्हिडिओ बनवून अज्ञात व्यक्ती सतत राकेश टिकैत यांच्या नंबरवर पाठवत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चौकशीसाठी राकेश टिकैत यांनी आरोपींच्या नंबरशी संबंधित तपशीलही पोलिसांना उपलब्ध करुन दिला आहे. या प्रकारामुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप निर्माण झाला आहे. राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेलेली ही तिसरी घटना आहे.

कोण आहेत राकेश टिकैत ?

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनातून शेतकरी नेते राकेश टिकैत यांच नाव समोर आले आहे. सध्या हे नाव देशपातळीवर चर्चेत आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी गावाकडे परतले होते. मात्र, राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर शेतकरी आंदोलनाला पुन्हा एकदा नवी आशा मिळाली. सध्या राकेश टिकैत देशभरात शेतकरी पंचायत घेत आहेत.

शेतकऱ्यांची भूमिका -

शेतकरी आंदोलन बांधून ठेवण्यात राकेश टिकैत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, वेळ आली तर शेतकऱ्यांसाठी आत्महत्या करेल, असा इशाराही राकेश टिकैत यांनी दिला. आता केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील हा संघर्ष कुठपर्यंत जातो, हे पाहणं आता महत्त्वाच ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details