भुवनेश्वर : शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस हे रुळावरून घसरल्यानंतर थांबलेल्या मालगाडीला धडकली. या अपघात ट्रॅकवर रेल्वे डबे कोसळले असताना दुसरी पॅसेंजर ट्रेन - बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसने धडक दिली. या तिहेरी रेल्वे अपघातात किमान २८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११०० हून अधिक प्रवासा जखमी झाले आहेत. वेळीच एनडीआरएफचे पथक आल्याने अनेकांची सुटका करण्यात आली.
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे (NDRF) जवान व्यंकटेश सुट्टीसाठी पश्चिम बंगालमधील हावडा येथून तामिळनाडूला घरी जात होते. एसी कोच बी-7 असताना त्यांचा रेल्वे डबा रुळावरून घसरला. मात्र, पुढील डब्यांशी धडकला नसल्याने ते सुखरुप राहिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कोलकाता येथील एनडीआरएफच्या दुसऱ्या बटालियनमध्ये तैनात असलेल्या 39 वर्षीय व्यंकटेश यांना रेल्वेच्या अपघाताची तीव्रता जाणवली. तेव्हा त्यांना तातडीने प्रथम बटालियनमधील वरिष्ठ निरीक्षकांना अपघाताची माहिती दिली.
जवानाने प्रवाशांना वाचविण्यासाठी केली धडपड:घटनास्थळी पथकाला पोहोचणे सुलभ व्हावे याकरिता काही फोटो आणि लाईव्ह लोकेशन त्यांनी व्हॉट्सअपवरून एनडीआरएफच्या कंट्रोल रुमला पाठविले. याचाच वापर करून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. एनडीआरएफचे जवान व्यकंटेश म्हणाले, की अपघातात मला मोठा धक्का बसला. काही वेळात काही प्रवासी खाली पडताना दिसले. तातडीने पहिल्या प्रवाशाला बाहेर काढून रेल्वे ट्रॅकजवळील दुकानात बसले. त्यानंतर अपघातात अडकेल्या इतरांच्या मदतीसाठी धावलो. जखमी आणि अडकलेल्या प्रवाशांना शोधताना अंधाराचा अडथळा होता. मदतीचे प्रयत्न करताना मोबाईलच्या टॉर्चचा वापर केला. प्रवाशांना डब्यातून बाहेर काढत सुरक्षित स्थळी नेले.