बारगड - ओडिशा (Odisha) राज्यातील कामागाव उच्च माध्यमिक स्कूल (Kamagaon Higher Secondary School) मध्ये एका 11 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या 20 मित्रांचा जीव केवळ यासाठी धोक्यात घातला, कारण त्याला शाळेतून सुट्टी पाहिजे होती. ही शाळा ओडिशामधील बारगड जिल्ह्यातील भाट्ली ब्लॉक(Bhatli Block of Bargarh District of Odisha ) मध्ये आहे.
शाळेला सुट्टी मिळावी म्हणून वसतीगृहातील 20 मित्रांना पाजले कीटकनाशक - सुट्टीसाठी मित्रांना किटकनाशक मिश्रित पाणी दिले
ओडिशामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी मिळावी केवळ इतक्या कारणासाठी अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या 20 मित्रांना कीटकनाशक मिश्रित पाणी प्यायला दिले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उलट्या व मळमळ होऊ लागली. सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
शाळेचे प्राचार्य प्रेमानंद पटेल (Principal Premanand Patel) यांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्याने आपल्या हॉस्टेलमधील 20 मित्रांना कीटनाशक(poisonous insecticide ) मिसळलेल्या ग्लासमधून पाणी पाजले. त्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्य व मळमळीचा त्रास सुरू झाल्यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारानंतर सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. प्राचार्यांनी सांगितले की, 16 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला वाटले की, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळल्यानंतर लॉकडाऊन लावला जाईल व शाळेला सुट्टी मिळेल.
मात्र असे न झाल्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र तो अल्पवयीन असल्याने व भविष्याच्या दृष्टीने विचार करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्याला काही दिवसांसाठी शाळेतून निलंबित करण्यात आले आहे. हा विद्यार्थी दोन दिवस नौपाली येथे वास्तव्य करून 6 डिसेंबर रोजी वसतीगृहात परतला होता. 1992 मध्ये स्थापन झालेल्या या सरकारी अनुदानित शाळेच्या वसतिगृहात 300 हून अधिक विद्यार्थी राहतात.