रायगड : ओडिशातील रायगडा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका दरोडेखोराने पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन चोरल्याची बातमी आहे. रुद्र सिबा असे आरोपीचे नाव असून तो आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील एटिडा गावचा रहिवासी आहे.
धक्कादायक प्रकार; दरोडेखोरांनी चक्क पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन चोरली, आरोपी अटकेत - rayagada arrested in Andhra Pradesh
ओडिशातील रायगडा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका दरोडेखोराने पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन चोरल्याची बातमी आहे. रुद्र सिबा असे आरोपीचे नाव असून तो आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील एटिडा गावचा रहिवासी आहे.
police patrolling vehicle
मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रने पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन चोरली होती. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. नंतर पोलिसांना चोरीची व्हॅन आंध्र प्रदेशातील पार्वतीपुरम येथे सापडली आहे. घटनास्थळावरून रुद्रला अटक करण्यात आंध्र पोलिसांना यश आले आहे.
रुद्रने पोलिस पेट्रोलिंग वाहन का चोरले आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू केला आहे.