क्योंझर : ओडिशामधील क्योंझर जिल्ह्यातील एका गावातील लग्न सोहळ्यादरम्यान मोठा रस्ते अपघात झाला आहे. लग्नाच्या वरातीला ट्रकने चिरडल्याची घटना घडल्याने लग्न सोहळ्यावर शोककळा पसरली आहे. ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवार उशिरा रात्री सातीघर साहूजवळील राष्ट्रीय महामार्ग 20 वर हा अपघात झाला. लग्नाची वरात वधूच्या घराकडे निघाली असताना एक भरघाव वेगाने येणारा ट्रक वरातीत घुसल्याने 6 वऱ्हाडी लोकांचा मृत्यू झाला आहे.
पाच जणांचा जागेवर मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार,रात्री 1 ते दीड वाजण्याच्या सुमारास लग्नाची मिरवणूक लग्नासाठी वधूच्या ठिकाणाकडे जात होती. त्यादरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने लग्नाच्या मिरवणुकीला धडक दिली. यात 5 जण जागीच ठार झाले होते तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना क्योंझर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केले आहे.
हेमंत पात्राची होती वरात : हाती आलेल्या माहितीनुसार, सातीघर साही (जि. केंझार) येथील मूळ रहिवासी असलेल्या कार्तिक पात्राच्या मुलीचे लग्न हेमंत पात्राशी होत होते. हेमंत पात्रा हा हरिचंदनपूर तालुक्यातील मानपूर गावातील हडीबंधू पात्रा यांचा मुलगा. या दोघांचा विवाह मंगळवारी रात्री होत होता. लग्नाच्या रात्री नवरदेव हेमंत आपली वरात घेऊन वधूकडे निघाला होता. डीजेच्या गाण्यावर वऱ्हाडी नाचत-नाचत जात होते. नवरदेवाची वरात वधूच्या घराच्या काही अंतरावर होती अशात एक भरवाध येणारा ट्रक थेट वरातीत घुसला. या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बसची समोरासमोर धडक : काही दोन दिवसापूर्वीही दोन बसचा अपघात झाला होता. गंजाम येथे सोमवारी ओएसआरटीसी बस आणि खासगी बस यांच्यातील धडकेत किमान 12 प्रवासी ठार झाले होते. तर 6 जण जखमी झाले होते. गंजम जिल्ह्यातील दिगापहांडीजवळ हा भीषण रस्ता अपघात झाला होता. बेरहामपूर भागातील खंडादेउली गावातून परतत असलेल्या खासगी बसमध्ये लग्नाचे वऱ्हाड जात होते.
हेही वाचा
- Odisha Bus Accident: ओडिशा परिवहन-खासगी बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 12 प्रवासी ठार
- Odisha Train Accident : 51 तासानंतर बालासोर अपघातस्थळावरून रेल्वे रवाना, बेवारस मृतदेहाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांना कोसळले रडू