भुवनेश्वरओडिशा सरकार Odisha Govt gift to newlywed couple नवविवाहित जोडप्याला कौटुंबिक नियोजन किट भेट gift family planning kits देणार आहे. ज्यामध्ये कंडोम आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित इतर आरोग्यविषयक आवश्यक गोष्टींचा समावेश असेल. नॅशनल हेल्थ मिशन NHM अंतर्गत नई पहल योजना Nai Pahal Scheme 2022 नावाच्या नवीन उपक्रमाचा उद्देश तरुण जोडप्यांनी कुटुंब नियोजनाच्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी पद्धतींचा अवलंब करणे आणि त्याविषयी जागरूकता वाढवणे increase awareness about family planning हा आहे.
सप्टेंबरपासून किटचे वाटप ओडिशा राज्य सरकारने नवविवाहितांना वेडिंग किट भेट Odisha Wedding Kits देण्याची योजना आखली आहे. यामध्ये कुटुंब नियोजन, विवाह नोंदणी फॉर्म, कंडोम, तोंडी आणि आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घेण्याच्या पद्धती आणि कुटुंबनियोजनाचे फायदे याविषयीची पुस्तिका असणार आहे. याशिवाय किटमध्ये गर्भधारणा चाचणी किट, टॉवेल, कंगवा, बिंदी, नेल कटर आणि आरसा यांसारखी सौंदर्य सामग्री देखील असेल. कुटुंब नियोजन संचालक डॉ. बिजय पाणिग्रही म्हणाले की, मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांना आशा यावर्षी सप्टेंबरपासून नवविवाहित जोडप्यांना किटचे वाटप करण्याचे काम सोपवले जाईल. नवीन जोडप्यांना ऩई पहल योजना या उपक्रमाद्वारे कुटुंब नियोजन पद्धतींचा अवलंब करण्यास योग्यरित्या प्रोत्साहित केले जाईल. याची खात्री करण्यासाठी आशांना प्रशिक्षण दिले जात आहे.