चेन्नई :एआयएडीएमकेचे पदच्युत नेते ओ. पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी सांगितले की, के पलानीस्वामी यांना पक्षाचे अंतरिम सरचिटणीस म्हणून कायम ठेवण्याचा सर्वोच्च नायालयाचा निकाल त्यांच्यासाठी धक्कादायक नाही. मात्र ते आता या प्रकरणी लोकांपर्यंत जाऊन न्याय मिळवतील.
'लोकांपर्यंत पोहचून न्याय मिळवू' : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना पन्नीरसेल्वम म्हणाले की, हा निकाल आमच्यासाठी धक्कादायक नाही. या निकालानंतर आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह संचारला आहे. 'धर्मयुद्ध' सुरू आहे असे ठासून सांगता पन्नीरसेल्वम म्हणाले की, ते आणि त्यांचे कार्यकर्ते न्याय मागण्यासाठी लोकांपर्यंत जातील. लोकांपर्यंत पोहोचण्याची ही मोहीम लवकरच सुरू होणार असून ती राज्यभर जिल्हानिहाय राबवण्यात येणार आहे. एआयएडीएमके हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि संस्थापक एम जी रामचंद्रन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्वोच्च नेता निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे 10 जिल्हा सचिवांनी एखाद्या व्यक्तीचा प्रस्ताव ठेवला पाहिजे आणि त्यास तितक्याच सचिवांनी दुजोरा दिला पाहिजे, असे पन्नीरसेल्वम म्हणाले.
'पलानीस्वामी हे द्रमुकची ए टू झेड टीम' :पन्नीरसेल्वम यांच्यावर हे सत्ताधारी द्रमुकची 'बी' टीम आहेत असे आरोप विरोधकांकडून लावण्यात येतो. या आरोपांवरील प्रश्नाला उत्तर देताना पनीरसेल्वम म्हणाले की, पलानीस्वामी कॅम्प हा द्रमुकची ए टू झेड टीम आहे. पन्नीरसेल्वम यांचे कट्टर निष्ठावंत आर वैथिलिंगम यांनी पलानीस्वामी यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यांसह अनेक प्रकरणांचे निकाल जाणून घेण्याची मागणी केली. माजी मंत्री वैथिलिंगम यांनी कोडनाडू हत्या आणि चोरी प्रकरणाचाही उल्लेख केला आहे.