महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Parenting News : थंडीमध्ये मुलांना जायफळ खायला देणे, मुलांसाठी ठरते खूप फायदेशीर - health perspective

पालक म्हणटलं की, सतत मुलांच्या आरोग्याची काळजी लागलेली असते. हिवाळ्यात मात्र आरोग्याच्या बाबतीत मुलांची अति काळजी घ्यावी लागते. मुलांना सर्दी, खोकला, कफ होऊ नये, यासाठी पालक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करतात. जायफळ देखील अश्याच औषधी पदार्थांपैकी (Nutmeg is very useful for children from health perspective) एक आहे. जाणुन घेऊया जायफळ चे फायदे. Parenting News

Parenting News
मुलांसाठी ठरते खूप फायदेशीर

By

Published : Dec 7, 2022, 3:38 PM IST

जायफळ केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर, तुमचे आरोग्यही सुधारते. त्याचे आवरण खूप कठीण आहे. पण त्याचे फायदे फार जास्त आहे. हे खाण्याचे फायदे मुलांसाठी देखील खूप चांगले आहेत. यातील पोषक घटक मुलांच्या आरोग्याच्या (Nutmeg is very useful for children from health perspective) काही सामान्य समस्या दूर करण्यात मदत करतात. Parenting News

1. जर तुमच्या मुलांचे पोट खूप खराब झाले असेल, तर या जायफळचा आहारात नक्कीच समावेश करा. यामुळे आतडे चांगले स्वच्छ होतात. जायफळ मध्ये फायबर गुणधर्म असतात, जे पचनसंस्था मजबूत करतात.

2. जर तुमच्या मुलाच्या डोक्यात नेहमी डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर त्याचा वापर केल्यास नक्कीच आराम मिळेल. डोकेदुखीपासून आराम मिळवण्याचा हा एक सोपा उपाय आहे.

3. सर्दी खोकल्यामध्येही जायफळ मधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म खूप फायदेशीर आहेत. त्याचा प्रभाव उष्ण असतो. ज्यामुळे ते मुलांना थंडीपासून बचाव करण्याचे काम करते.

4. मुलांच्या दुधात जायफळ मिसळल्यास त्यांची भूक वाढते. जर तुमचे मूल काही खात नसेल, तर हा घरगुती उपाय त्यांच्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे आतापासून या त्रासात मुलांना जायफळ खायला सुरुवात करा.

5. जायफळचा व्यवस्थित डोस घेतल्यास हृदयविकारांपासून आपण बचाव करू शकतो. कफ, हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरतं. लहान मुलांना कफ होण्याचे प्रमाण जास्त असते. तेव्हा जायफळ उपयोगी ठरु शकते.

6. जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्यास ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं. जर तुमची मुले फार जास्त चिडचिड करत असेल, तर त्यांना नक्की जायफळ खायला द्या.

7. जायफळ पाचनक्रिया चांगली करतं. दररोज जेवल्यानंतर जायफळ तुकड्याच्या रूपात किंवा पावडर करून त्याचा वापर करावा. पोटाच्या समस्या दुर करण्यासाठी पाचन क्षमता वाढविण्याचं काम जायफळ करतं.

8. जायफळामध्ये तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचेही गुण असतात. अनेक वेळा गळ्याजवळ व्हायरस किंवा बॅक्टेरिया चिटकून राहतात आणि त्यामुळे तोंडाला दुर्गंध येतो. लहान मुलांच्या तोंडाचा दुधाचा वास येतो. किंवा त्यांनी काहीही खाल्लं की ते पाणी निट पित नाही. त्यासाठीही जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होतो.

9. जायफळमध्ये अँटऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स असतात जे डोळ्यांशी निगडित आजारांवर फायदेशीर ठरतात. डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचं काम जायफळ करतं. जायफळ डोळ्यांचं दुखणं, जळजळ आणि सूज कमी करतं. आजकाल लहान वयातील सगळेच मुलं मोबाईल व लॅपटॉपचा वापर करतात. तेव्हा त्यांचे डोळे चांगले राहावे यासाठी जायफळ पाण्यासोबत उगाळून घ्यावं आणि ते डोळ्यांवर बाहेरून लावावं. लक्षात ठेवा डोळ्याच्या आत ही पेस्ट जाता कामा नये. Parenting News

ABOUT THE AUTHOR

...view details