महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

१८ वर्षीय नर्सवर सामूहिक बलात्कार.. रुग्णालयाच्या भिंतीवर लटकावला मृतदेह.. - Nurse raped and hung on the wall

उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये शुक्रवारी बांगरमाऊ कोतवाली परिसरातील न्यू जीवन रुग्णालयात नोकरीवर रुजू झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह रुग्णालयाच्या भिंतीला संशयास्पद स्थितीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार ( Gang rape in Unnao ) आणि खुनाचा गुन्हा दाखल केला ( Nurse murdered after gang rape ) आहे.

Nurse murdered after gang rape in unnao of uttar pradesh
१८ वर्षीय नर्सवर सामूहिक बलात्कार.. रुग्णालयाच्या भिंतीवर लटकावला मृतदेह

By

Published : May 1, 2022, 3:44 PM IST

उन्नाव ( उत्तरप्रदेश ) : बंगरमाऊ कोतवाली भागातील न्यू जीवन रुग्णालयात नोकरीवर रुजू झालेल्या परिचारिकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत रुग्णालयाच्या भिंतीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलीस आणि कुटुंबीयांना दिली. मुलीच्या मामाने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची भीती व्यक्त केली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार ( Gang rape in Unnao ) आणि खुनाचा गुन्हा दाखल केला ( Nurse murdered after gang rape ) आहे.

बांगरमाऊ येथील दुल्लापुरवा गावाजवळ नवीन नवजीवन नर्सिंग होम कार्यरत आहे. जवळच्या गावात राहणारी 18 वर्षांची मुलगी काल म्हणजेच शुक्रवारी परिचारिका म्हणून कामावर रुजू झाली होती. शनिवारी तिचा मृतदेह नवीन जीवन रुग्णालयाच्या भिंतीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळताच कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. यासोबतच रुग्णालयाच्या भिंतीला नर्सचा मृतदेह लटकल्याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. यानंतर नर्सचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मुलीवर बलात्कार करून खून केल्यानंतर मृतदेह लटकवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

एएसपी शशिशेखर सिंह यांनी सांगितले की, बांगरमाऊ कोतवाली भागातील न्यू जीवन हॉस्पिटलमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. हत्येचे कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. बलात्कारानंतर खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी आरोप लावलेल्या तिघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तपासात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

हेही वाचा : Gang Rape in Ranchi : रांचीमध्ये दोन तरुणींवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार; 5 जणांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details