लेस कायेस (हैती) - हैतीमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी होती. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या संख्येमध्ये रविवारी वाढ झाली. किमान ७२४ नागरिकांचा मृत्यू, तर किमान २ हजार ८०० नागरिक जखमी झाले आहेत. हैतीच्या नागरिक संरक्षण कार्यालयाचे संचालक जेरी चँडलर यांनी, बचावकर्ते ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत, असे सांगितले.
हेही वाचा -...तर आपल्याला चीन पुढे झुकावे लागेल - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
शनिवारी हैतीच्या दक्षिण-पश्चिम भागात जोरदार भूकंप आला होता. या भूकंपाने काही शहरे जवळजवळ उदध्वस्त केली होती. भूकंपाचे केंद्र हे पोर्ट-औ-प्रिन्सच्या राजधानीपासून १२५ कि.मी पश्चिमेला होते, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली.