भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी, खेडे, शहरे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ब्रिटिशांचा विरोध झाला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, सर्व क्रांतिकारकांना सलाम करू आणि 'आझादी का अमृत महोत्सव' ला अर्थ प्रदान करू, असे टि्वट योगी यांनी केले.
#IndiaAt75 : पंतप्रधान मोदींसह मान्यवरांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!, वाचा एका क्लिकवर - मान्यवरांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
09:10 August 15
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशाला स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
09:00 August 15
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
08:55 August 15
काँग्रेसकडून देशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
08:54 August 15
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
08:51 August 15
उत्तर प्रदेशचे मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
08:44 August 15
केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन देशवासियांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आज आपण शपथ घेऊया, की आपण आपल्या देशाला गरिबी, जातिभेद, लैंगिक असमानता, सांप्रदायिक विचारधारा, सांप्रदायिकता आणि सर्व सामाजिक अन्यायाच्या बंधनातून मुक्त करू आणि स्वातंत्र्याचा अर्थ परत मिळवू. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, या शब्दात विजयन यांनी शुभेच्छा दिल्या.
08:42 August 15
पंतप्रधानांनी ट्वीट करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सर्वांना 75 व्या स्वातंत्र्य दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशवासियांमध्ये नवी चेतना, नवी उर्जा प्राप्त होवो, अशी भावना पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.
08:41 August 15
#IndiaAt75 : पंतप्रधान मोदींसह मान्यवरांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!, वाचा एका क्लिकवर
नवी दिल्ली - देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित केले. तत्पूर्वी पंतप्रधानांनी ट्वीट करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुम्हा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!' असे ते ट्विटमध्ये म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर मान्यवरांनीही जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी लष्कराकडून 21 तोफेंची सलामी देण्यात आली. लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमावर भारतीय वायुदलाच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. ऑलिंपिकपटू कार्यक्रमाचे विशेष पाहुणे आहेत. सुवर्णपदक विजेता भालाफेक पटू नीरज चोप्रा सह 32 ऑलिंपिक विजेते खेळाडू देखील सहभागी झाले. तसेच देशामध्ये सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचा -स्वातंत्र्य दिन विशेष : तिरंगी फुलांनी सजला विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा, पाहा व्हिडिओ..
हेही वाचा - 75th Independence Day: मुलींच्या यशात विकसित भारताची झलक - राष्ट्रपती रामनाथ कोविंद
हेही वाचा - 75वा स्वातंत्र्यदिवस : 100 लाख कोटींची पंतप्रधान गतीशक्ती योजना लाँच करणार; पंतप्रधानांचं प्रतिपादन