महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गँगरेप पीडितेचा नग्नावस्थेत धावतानाचा व्हिडिओ २० दिवसांनी व्हायरल, पोलिस विभागात खळबळ - बलात्कारानंतर पीडितेचा निर्वस्त्र पळतानाचा व्हिडिओ

मुरादाबादमधील गँगरेप घटनेच्या 20 दिवसांनंतर पीडितेचा नग्नावस्थेत रस्त्यावर धावतानाचा व्हिडिओ व्हायरल ( nude video of gang rape victim goes viral ) झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. त्यानंतर एसपी संदीप कुमार मीणा यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि या प्रकरणात पोलिसांचे समर्थन केले. पूर्ण बातमी वाचा.

NUDE VIDEO
NUDE VIDEO

By

Published : Sep 21, 2022, 7:20 PM IST

मुरादाबाद : जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या २० दिवसांनंतर एक व्हिडिओ ( nude video of gang rape victim goes viral ) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पीडित मुलगी रस्त्यावर नग्नावस्थेत धावत आहे. सामूहिक बलात्कारानंतर गावप्रमुखाने मुलीला विवस्त्र करून रस्त्यावर पळण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. अशा अवस्थेतच पीडिता तिच्या घरी पोहोचली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसपी संदीप कुमार मीना यांनी या प्रकरणी पोलिसांची बाजू घेतली. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पीडितेचे व तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले असता त्यांनी असा प्रकार घडल्याचा इन्कार केला होता. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिस म्हणतात, पीडिता आणि तिच्या कुटुंबियांकडून या घटनेचा इन्कार

मुरादाबादचे एसपी संदीप कुमार मीना यांनी सांगितले की, सामूहिक बलात्काराची घटना १ सप्टेंबर २०२२ रोजी घडली. एसएसपीच्या आदेशानुसार 7 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नोंदवलेल्या अहवालानुसार, 1 सप्टेंबर रोजी मुरादाबादच्या भोजपूर पोलीस स्टेशन परिसरात एक 15 वर्षीय किशोरवयीन मुलगी लाठीचा मेळा पाहून घरी परतत होती. यादरम्यान भोजपूर येथील इस्लामनगर गावातील रहिवासी नितीन, कपिल, अजय, नौशे अली आणि इम्रान यांनी तिला जबरदस्तीने उचलून सैदपूर खड्डर गावच्या जंगलात नेले. जिथे आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आवाज ऐकून शेजारील शेतात काम करणारे लोक घटनास्थळी पोहोचले असता पाच तरुण पळून गेले. यादरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या गावप्रमुखाने पीडितेला नग्न अवस्थेत घरी जाण्यास भाग पाडले. तिने कसेतरी ओरडत घर गाठले आणि घरच्यांना घडलेली घटना सांगितली.

घटनेवर एका तरुणीने केलेले ट्विट

मंगळवारी एका तरुणीने ट्विटकेले, ज्यामध्ये पीडित मुलगी नग्न अवस्थेत धावताना दिसत आहे. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओची बातमी पोलिसांपर्यंत पोहोचताच खळबळ उडाली. मंगळवारी रात्री ८ वाजता एसपीसंदीप कुमार मीना यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. एसपींनी सांगितले की, 7 सप्टेंबर रोजी मुलीच्या काकांनी भोजपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर लगेच गुन्हा दाखल करून मुलगी व तिच्या पालकांचे जबाब घेण्यात आले. पुराव्याच्या आधारे एका आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली असून अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details