तिनसुकिया :स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ईशान्येकडील भारत-म्यानमार सीमेवर दहशतवादी हल्ला झाला. अरुणाचल आणि नागालँडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आसाम रायफल्सची ULFA-I आणि NSCN दहशतवाद्यांशी चकमक झाली. आसाम रायफल्सने अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यातील पंचुपास भागात नवीन छावणी उभारली होती. NSCN-IM आणि ULFA-I च्या अतिरेक्यांनी मंगळवारी पहाटे 3 वाजता छावणीवर हल्ला केला. अरुणाचलमधील नाकानो भागात लष्कराच्या आणखी एका छावणीवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला.
दुसरीकडे नागालँडच्या चेरामोटायेथील लष्कराच्या तळावरही याच दहशतवादी गटाने हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी कॅम्पवर मोर्टारने हल्ला केला. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.