नवी दिल्ली -भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात शांघाय सहकार्य संस्थेत(एससीओ) कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्यासाढी जागतिक कृती कार्यक्रम निश्चित करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी एससीओ बैठकीत ठेवला आहे.
ताजिकिस्तानच्या अध्यक्षतेखाली एससीओच्या बैठकीत सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना निमंत्रित करण्यात आले आहे. ही बैठक २३ जूनपासून सुरू झाली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी रशियाचे सुरक्षा सल्लागार निकोलाई पात्रूशेव यांच्याशी चर्चा केली. त्या दोघांमध्ये द्विपक्षीय, प्रादेशक आणि जागतिक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.
हेही वाचाकोरोना कमी होतोय! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54 हजार रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट 96.61 वर
अजित दोवाल बैठकीत काय म्हणाले ?
- दहशतवाद्यांना आर्थिक रसद मिळत असताना त्याविरोधात एससीओ आणि एफएटीएफमध्ये सामजंस्य करार करावेत, अशी मागणी अजित दोवाल यांनी बैठकीत केली.
- तसेच त्यासाठी आंतरराष्ट्रीय नियामके स्वीकारावीत, अशी त्यांनी भूमिका मांडली.
- दहशतवादी हे तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर करतात. दुसरीकडे डार्क, वेब, कृत्रिम मानवी बुद्धिमता आणि सोशल मीडियाचा गैरवापर करतात. त्यामुळे त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज असल्याचे दोवाल यांनी म्हटले आहे.
- दोन दशंकांमध्ये अफगाणिस्तानने जे मिळविले आहे, ते टिकायला हवे. तेथील लोकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
- संयुक्त राष्ट्रसंघाने ठरावानुसार घोषित केलेल्या दहशतावद्यांविरोधात नियमांप्रमाणे कठोर कारवाई व्हावी.